जनता महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळा

जनता महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी संदर्भात मार्गदर्शन शिबिर

व कार्यशाळा

चंद्रपूर, दि. 21 एप्रिल: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे जात पडताळणी संदर्भात मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळा पार पडली.

याप्रसंगी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे, समितीचे सदस्य तथा उपायुक्त विजय वाकुलकर, जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर आदी मान्यवरांनी या मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला.

या कार्यशाळेला जिल्ह्यातील कनिष्ठ विद्यालय, महाविद्यालयातील प्राचार्य, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी व पालक प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर मार्गदर्शन शिबिर व कार्यशाळेत जात पडताळणीच्या कार्यप्रणालीबाबत समितीचे अध्यक्ष सचिन कलंत्रे आणि उपायुक्त विजय वाकुलकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यशाळेत उपस्थितांना चर्चेद्वारे  ऑनलाइन प्रणालीबाबत येणाऱ्या समस्येवरील उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेत उपस्थित अभ्यागंताच्या शंकांचे निरसन प्रश्नोत्तराने करण्यात आले.