फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून 10 हजारांच्यावर नागरिकांची आरोग्य तपासणी Ø पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने चार फिरते दवाखाने

फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून

10 हजारांच्यावर नागरिकांची आरोग्य तपासणी

Ø पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने चार फिरते दवाखाने

चंद्रपूर, दि. 7 एप्रिल : आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने मेडिकेअर हेल्थ सर्व्हीसेस मार्फत चंद्रपूर, ब्रम्हपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यासाठी फिरत्या दवाखान्यांची सेवा उपलब्ध झाली आहे‌. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत तपासणी आणि औषधोपचार करण्यात येत असून दोन महिन्यात 10 हजारांच्या वर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.

यात चंद्रपूर तालुक्यातील पिपरी धानोरा, नकोडा, तडाळी, येरुर अशा एकूण 17 गावात 2299 नागरिकांची तपासणी, ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा, तुलनमेंढा, वायगाव, कोसंबी, हळदा, चांदली व इतर अशा एकूण 15 गावात 3493, सावली तालुक्यातील हिरापूर, डोनाळा, पारडी, सायखेडा, चारगाव व इतर अशा 13 गावात 2423  आणि सिंदेवाही तालुक्यातील घोट, किन्ही, कच्चेपार, जामसाळा व इतर अशा 12 गावात 1815 अशा एकूण 10 हजार 30 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात सर्दी, खोकला, ताप, शरीर वेदना, मधुमेह चाचणी, रक्तदाब, कोरोना तपासणी आदींचा समावेश होता.

या फिरत्या दवाखान्यात एक डॉक्टर, परिचारिका व हेल्पर असून प्राथमिक आरोग्यासाठी 20 प्रकारची औषधी उपलब्ध आहे.