chandrapur I शासकीय मुलींचे निरीक्षण गृह या संस्थेकरिता इमारत भाड्याने घेणे आहे

शासकीय मुलींचे निरीक्षण गृह या संस्थेकरिता इमारत भाड्याने घेणे आहे

चंद्रपूर मनपा हद्दीत इमारत उपलब्ध असल्यास कळविण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.26 एप्रिल: अधीक्षक, शासकीय अपंग मुलांचे बालगृह, चंद्रपूर ही संस्था शासन स्तरावरून बंद करून त्याऐवजी अधिक्षक, शासकीय मुलींचे निरीक्षण गृह- बालगृह सुरू करणेबाबत शासनस्तरावरून सूचित करण्यात आलेले आहे.

चंद्रपूर महानगर पालिका हद्दीत महिला व बाल विकास विभागांतर्गत शासकीय मुलींचे निरीक्षण गृह-बालगृह या कार्यालय-संस्थेकरीता चटई क्षेत्रफळ कमीत कमी 4000 चौ.फुट व जास्तीत जास्त 8000 चौ.फुट व मोकळी जागा, मुबलक पाणी, पुरेसा सूर्यप्रकाश व खेळती हवा असणारी इमारत भाड्याने घेणे आहे.

सदर इमारत भाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्धारीत केल्यानुसार देण्यात येईल. तरी, पुढील वर्णनाची इमारत उपलब्ध असल्यास संबंधितांनी अधिक्षक, पी.बी.भांदककर 9420045030, समुपदेशक एन.के.गाडगे 9421880950, लिपीक के.पी. खोब्रागडे 9420438824 या क्रमांकावर संपर्क साधावा असे अधिक्षक, शासकीय अपंग मुलांचे बालगृह यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.