chandrapur I पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित

चंद्रपूर, दि. 15 एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गोरविण्यात येते सन 2016-17 व 2018-19 तसेच 2019-20 साठी सदर पुरस्कारासाठी इच्छूक व्यक्ती संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत पुरस्काराचे स्वरूप व अर्हता पुढील प्रमाणे आहे.

राज्यस्तरीय पुरस्कार 1,00,001 रुपये रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा ज्या महिलाना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याच्या 5 वर्षापर्यत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार आहे.

तसेच विभागीय पुरस्कार 25,001 रुपये रोख स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 7 वर्ष कार्य असावे, नोंदणीकृती संस्थेत दलितमित्र पुरस्कार प्राप्त नसावा, संस्था राजकारणापासून अलिप्त असावे तसेच तिचे कार्य व सेवा ही पक्षातील व राजकाराणापासून अलिप्त असावी.

जिल्हास्तरीय पुरस्कार 10,001 रूपये रोख, स्मृमीचिन्ह व सन्मानपत्र,शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्षाचा सामाजिक कार्य असावे ज्या महिलाना दलितमित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई पुरस्कार मिळालेला आहे, त्या महिलांना हा पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.

तसेच वरिला प्रमाणे महिला अर्हता असणा-या इच्छूक व्यक्ती संस्थांनी अर्हतेशी संबंधीत आवश्यक कागदपत्रे तसेच खालील प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार प्रस्ताव धारकांची माहिती केलेल्या कार्याचा तपशील वृत्तपत्र फोटोग्राफस इत्यादी सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे व यापूर्वी पुरस्कार मिळाले आहे काय असल्यास तपशील विभागीयस्तर पुरस्कार व संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल वृतपत्र फोटोग्राफस इत्यादी संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाले आहे काय असल्यास तपशील संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत.

तरी इच्छूक व्यक्ती संस्थांनी विहित नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जुना कलेक्टर बंगला आकाशवाणीचे मागे, साईबाबा वार्ड, सिव्हिल लाईन,चंद्रपूर फोन नंबर क्रमांक 07172-255667 येथे संपर्क साधावा व आवश्यक त्या सर्व कागदापत्राह आपला प्रस्ताव ही बातमी प्रसिध्दी झाल्यापासून 10 दिवसाच्या आत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, चंद्रपूर येथे सादर करावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी चंद्रपूर यांनी कळविले आहे.