अनुसूचित जमातीच्या बचत गटानी शेळी गट मिळण्यासाठी अर्ज आंमत्रित

अनुसूचित जमातीच्या बचत गटानी शेळी गट मिळण्यासाठी अर्ज आंमत्रित

 

गडचिरोली, दि.29: शासन निर्णय आदिवासी विकास विभाग, मंत्रालय मुंबई क्र केंद्रीय 2021/प्र.क्र.43/का.19 दिनांक 26.07.2022 अन्वये सन 2014-15 या आर्थीक वर्षातील विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत Supply of Goat Units to women SHGs ( 10 Female + 1 Male ) ही योजना मंजुर असुन सदर योजने अंतर्गत अनुसूचित बचत गटाना 10 शेळी व 1 बोकड वाटप करणार आहे.

प्रकल्प कार्यालय, गडचिरोली करीता 33 लाभार्थ्याकरीता 48.66 लक्ष निश्चिीत करण्यात आलेली असुन या कार्यालया अतर्गत येत असलेले 1) गडचिरोली 2) चामोर्शी 3) धानोरा 4) आरमोरी 5) कुरखेडा 6) वडसा 7) कोरची तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या बचत गटानी शेळी गट मिळण्यासाठी जास्तीत जास्त अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली येथे दिनांक 13 एप्रिल 2023 पर्यत सादर करण्यात यावे.

योजनेच्या अटी शर्ती:- महिला बचत गट नोंदणीकृत दाखला हा अनुसूचित जमातीचा असावा.महिला बचत गटातील किमान एका सदस्याकडे 7/12 दाखला असणे आहे.शेळायांना पिण्याच्या पाणी उपलब्ध असल्याचा ग्रामसेवकांचा दाखला आवश्यक आहे.बचत गटातील सदस्य अथवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी सदर योजनेचा लाभ यापुर्वी आदिवासी विकास किंवा इतर कोणत्याही शासकीय विभागामार्फत घेतलेला नाही. याबाबतचे सक्षम प्राधिकार/संबंधित ग्रामंपायतीचा ना हरकत दाखला जोडणे आवश्यक आहे.

बचत गटास देण्यात आलेली शेळी गट युनिट लाभार्थीकडुन विक्री करता येणार नाही किंवा एकाच लाभधारक कुटुंबाकडे एकापेक्षा अधिक लाभधारकाचे पशु एकाच ठिकाणी संगोपित केली जाणार नाही.महिला बचत गटानी योजनेचा अटी व शर्तीनुसार रु 100/- मुद्रांकावर करारनामा करुन देणे बंधनकार राहिल.योजना राबविण्याचा ठिकाणी विशेष केंद्रीय सहाय्य अंतर्गत मंजुर योजना सन 2014-15 अंतर्गत महिला बचत गटांना शेळी गटाचा पुरवठा करणें या आशयाचा नामफलक लावणे बंधनकारक राहिल.असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.