भंडारा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे ध्वजारोहन व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र वितरण 

भंडारा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे ध्वजारोहन व सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र वितरण 

भंडारा- दि. २६/०१/२०२४ रोजी प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा येथे मा. पोलीस अधीक्षक भंडारा लोहित मतानी यांच्या हस्ते ध्वजारोहन करून राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मा. पोलीस अधीक्षक यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनानिमीत्य शुभेच्छा दिल्या.

मा. पोलीस अधिक्षक भंडारा लोहित मतानी यांचे हस्ते पोलीस महासंचालक । सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवुन चालक सहायक पोलीस निरीक्षक सैय्यद दुरानी यांना सन्मापुर्वक प्रदान करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला अपर पोलीस अधिक्षक भंडारा ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा डॉ. अशोक बागुल, प्रभारी पोलीस उपअधिक्षक (गृह) सचिन पवार, राखीव पोलीस निरीक्षक रघुनाथ चौधरी व पोलीस उपनिरीक्षक प्रधान पोलीस निरीक्षक जितेद्र बोरकर जिवीशा भंडारा, पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिचोंळकर स्थागुशा भंडारा, आर.सी पी., क्यु. आर.टी., मुख्यालय पोलीस शाखेचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.