प्रत्येक समाज घटकातील समाज बांधव व भगिनींनी सामूहिक विवाह सोहळ्याकडे वळावे, खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन

प्रत्येक समाज घटकातील समाज बांधव व भगिनींनी सामूहिक विवाह सोहळ्याकडे वळावे, खासदार अशोकजी नेते यांचे प्रतिपादन

आदिवासी कवर समाज सेवा संस्था खडकाघाट (सोहले) यांच्या वतीनेे आदर्श सामूहिक विवाह संमेलन सोहळा ता.कोरची जि.गडचिरोली येथे आयोजित 

*२१ जोडप्यांचे विवाह सम्मेलन

*दहा हजारोंच्या वर‌ महिला पुरुषांची उपस्थितीत

*कवर समाजातील‌ पाच लोकांचे सत्कारमूर्ती शाल श्रीफळ देऊन सत्कार खा.अशोक नेते याच्या हस्ते करण्यांत आले.

कोरची:-कोरची येथील आदर्श सामुहिक विवाह संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार.अशोकजी नेते यांनी बोलतांना मागील दोन अडीच वर्ष कोरोना च्या काळात गेल्याने विवाह सोहळे होऊ शकले नाही.

आज लग्नसमारंभावर होणारा अनावश्यक पैसा पाण्यासारखा खर्च करून अनावश्यक‌ उधळपट्टीत खर्च केला जातो.अनेकदा अशा विविध वर्गांमधील स्पर्धेचे स्वरूपही येत असुन लग्न समारंभात आपला दर्जा दाखवण्यासाठी सामान्य माणूसही कर्जबाजारी होतो. कारण अनेक मुलींचे लग्न करताना वडिलांची कंबर मोडते, अशा प्रकारे लग्नासाठी घेतलेल्या कर्जामुळे उर्वरित आयुष्य कठीण होते. ही सर्व परिस्थिती टाळण्यासाठी गरजू कुटुंबातील मुलींनी कोणताही खर्च न करता विवाह लावावा, यासाठी अशा संस्थांची भूमिका कौतुकास्पद ठरते.असे प्रतिपादन या सामुहिक सोहळा संमेलनाच्या उद्घाटन समारंभ सोहळा प्रसंगी केले.

खासदार महोदय पुढे बोलतांना या सामुहिक विवाह कार्यक्रमांमध्ये चांगली संख्या दिसून येत आहे. हे देखील कौतुकास्पद आहे. या विवाह सोहळ्यात वेळेचा अपव्यय, हुंडा, उधळपट्टी यांसारख्या वाईट प्रथांपासूनही समाजाची सुटका होते. यासाठी समाजातील एका मोठ्या घटकानेही यात सहभागी होणे आवश्यक आहे.सामुहिक विवाहाचा फायदा असा आहे की होणारा अनावश्यक खर्च वाचु शकतो, विवाहावर होणारा अवाजवी खर्च इत्यादीमुळे समाजातील विविध घटकांनी सामूहिक विवाहांना प्रोत्साहन देणे आणि इतर वर्गांना जागरूक करणे ही देखील आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सामुहिक विवाहामुळे समाजात सामाजिक ऐक्य आणि जागृती येते.असे वक्तव्य यावेळी केले.

या आदर्श संमेलनाध्ये सत्कारणी मूर्ती म्हणुन गणेश फुलकवर (ए.पी.आय.)कोरची.गणेश सोनवानी नायब तहसिलदार कोरची, चेतन जमकातन लेखा अधिकारी गडचिरोली ‌जितेंद्र साहाळा (SET) उत्तीर्ण, कु.भाग्यश्री कपाट BAMS निवड करिता खासदार अशोक नेते व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यांत आले.

‌‌ ‌आदर्श विवाह संमेल मध्यें एकूण वर -वधुचा परिचय करून 21 जोडपाच्या विवाह लावुन देण्यात आले.त्या भेट वस्तु ‌देऊन पुढील वाढचालीला शुभेच्छा देण्यात आले.

‌‌आदर्श विवाह सोहळ्याचा दहा हजारोच्या वर लोकांची‌ महिला पुरुषाची उपस्थिती होती.

या आदर्श विवाह सम्मेलन यशस्वीतेसाठी कोरची तालुक्यातील कवर‌ समाजातील पदाधिकारी सदस्य व महिला, पुरुषांनी अथक परिश्रम घेतले.

आदर्श विवाह संमेलनांचे संचालन प्रा.गणेश सोनकलकी सर, प्रास्ताविक भिकम फुलकवर अध्यक्ष कवर समाज यांनी केले.

या प्रसंगी प्रामुख्याने मंचावर विवाह संमेलनांचे उद्घाटक म्हणुन खासदार तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते,अध्यक्ष म्हणुन भारतभाऊ दुधनांग संचालक.म.रा.आ.वि.मं

नाशिक,विशेष अतिथी अंबिका बंजार सभापती पंचायत समिती देवरी, मनोजभाऊ अग्रवाल कोरची , रामसुराम काटेंगे गोंड‌समाज अध्यक्ष कोरची,प्रा.देवराव गजभिये,आनंद चौबे ,गणेश सोनवानी नायब तहसिदार,पितांबर आरगदुल्ला जिल्हा उपाध्यक्ष कंवर समाज छ.ग.महा.

कोरची पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक,अमोल फडतरे ,गणेश फुलकवर ए.पी.आय.के.डी.चंद्रमा वडेगांव, सुनिता मडावी‌ सरपंच,, नरेश जमकातन,चेतन‌ जमकातन,पदमाकर मानकर,देशरबाई सोनकुकरा, रूखमन‌‌ घाटघुमर,डॉ.शैलेंद्र बिसेन नगरसेवक,अशोक फुलकवर,उमेश बागडेहरिया,जासल सांगसुरवार, लग्नुसन कार्यपाल,प्रा.मुरलीधर‌ रुखमोडे भिकम फुलकवर क्षेत्र अध्यक्ष (आदिवासी कवर समाज) पत्रकार राष्ट्रपाल नखाते,राहुल‌ अंबादे, आसाराम फूलकवर, राधेश्याम फूलकवर, परमानंद पूजेरी, प्रकाश गंगाकाचूर तसेच हजारोंच्या संख्येने महिला पुरुषांची उपस्थिती होती.