भाजपच्या महिला मेळाव्यात २४ कर्तृत्ववान, होतकरू स्त्रीशक्तीचा सत्कार

भाजपच्या महिला मेळाव्यात २४ कर्तृत्ववान, होतकरू स्त्रीशक्तीचा सत्कार

गडचिरोली :- दि.१२ मार्च २०२३

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गडचिरोली शहराच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रामनगर, गडचिरोली येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात महिला मेळावा व स्वकर्तुत्वाने व परिश्रम घेऊन कुटुंबाचे पालन पोषण व मुलांना उच्च शिक्षण देणाऱ्या कर्तबगार व होतकरू महिलांचा सत्कार कार्यक्रम आज दिनांक 12 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पार पडला.

कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदेश सदस्य बाबुरावजी कोहळे होते प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, माजी जिप सभापती रंजिता कोडाप, महिला आघाडी च्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, वछलाबाई मुनघाटे, महिला आघाडी च्या शहराध्यक्ष कविता उरकुडे, मांडवगडे, छाया श्रीपदवार, शहर महामंत्री रश्मीताई बाणमारे, शहर उपाध्यक्ष विवेक बैस, युवा नेते संजय मांडवगडे प्रामुख्याने उपस्थित होते

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गडचिरोली शहरातील निराधार विधवा महिला ज्या कोणतेही व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा व मुलांचे पालनपोषण व शिक्षण देत आहेत तसेच भाजीपाला विक्री, शिवणकाम,किराणा दुकान किंवा भांडी कपडे धुण्याचे काम करून मुलांना शिक्षण देणाऱ्या कर्तबगार व होतकरू अशा 24 स्त्री शक्तींचा आज भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने माजी परराष्ट्र मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या नावाने सन्मानचिन्ह देऊन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी काही विधवा शहिदांच्या पत्नीनी आपण किती कठीण परिस्थितीत मुलांचे पालनपोषण व शिक्षण केले याची हकीगत सांगितली.

 

कार्यक्रमाला गडचिरोली शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महिला आघाडीचे शहराध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री रश्मी बाणमारे , सचिव कोमल बारसागडे, ओबीसी आघाडीच्या शहर अध्यक्ष अर्चना निंबोड, पूनम हेमके, निताताई बैस, ज्योती बागडे, भावना कुलसंगे यांनी परिश्रम घेतले.