4 ते 11 मार्च कालावधीत कायदेविषयक जनजागृती द्वारे महिला सक्षमीकरण अभियान

4 ते 11 मार्च कालावधीत कायदेविषयक जनजागृती द्वारे महिला सक्षमीकरण अभियान

            चंद्रपूर, दि. 2 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण  व राष्ट्रीय महिला आयोग, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनात कायदेविषयक जनजागृती द्वारे महिला सक्षमीकरण अभियान दि. 4 ते 11 मार्च 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे.

सदर अभियान जागतिक महिला दिनाच्या सप्ताहादरम्यान पोंभूर्णा, भद्रावती, मुल, राजुरा व सिंदेवाही येथे आयोजित करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत संबंधित तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन संबंधित तालुका विधी सेवा समितीमार्फत केले जाणार आहे. तरी नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.