दहा वर्षापासून कर न भरणाऱ्या गोलबाजार येथील व्यापाऱ्याचे दुकान गाळे मनपाने केले सिल

दहा वर्षापासून कर न भरणाऱ्या गोलबाजार येथील व्यापाऱ्याचे दुकान गाळे मनपाने केले सिल
चंद्रपूर |  शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून मागील 10 जानेवारीपासून मालमत्ता व इतर कराच्या वसुलीची मोहीम सुरू आहे. त्यासाठी महानगरपालिकेने शंभर टक्के, 75 टक्के आणि आता 50 टक्के शास्ती माफीची योजना राबविली. तरीही वारंवार संपर्क करूनही अनेक दुकान गाळेधारकांनी आपला कर भरलेला नाही. मागील दहा वर्षांपासून कराचा भरणा न करणाऱ्या गोल बाजार येथील व्यापाऱ्याचे दुकान गाळे मनपाने चार मार्च रोजी सिल केले. 
 
गोल बाजार येथील पुरुषोत्तम मारोती खाडिलकर यांच्या गाळे क्रमांक 444 चा मालमत्ता कर मागील दहा वर्षांपासून थकीत आहे. ही थकित रक्कम 39 हजार 959 रुपयांची असून, मनपाच्या वसुली पथकाने आज चार मार्च रोजी दुकान गाळे सील केले. दरम्यान शहरातील मालमत्ताधारकांनी 15 मार्च पूर्वी आपल्या कराचा भरणा करावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.