chandrapur I सिंदेवाही : ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन व अपंग व्यक्तींना आरोमशीनचे वाटप…

ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन व अपंग व्यक्तींना आरोमशीनचे वाटप

काल दिनांक २०/०३ ला ग्रामपंचायत कार्यालय वाकल व जागृती महिला ग्रामसंघ वाकल यांचे संयुक्त विद्यमाने मौजा वाकल येथे ग्रामसंघ कार्यालयाचे उदघाटन व पाच टक्के 5% अपंग कल्याण स्व – निधी अंतर्गत अपंग व्यक्तींना आरो चे वाटप करण्यात आले.
ह्या कार्यक्रमा प्रसंगी शिलाताई कंनाके
उप सभापती पं.स.सिंदेवाही ह्यांनी उदघाटक म्हणून आपली उपस्थिती दर्शविली तसेच कार्यक्रम अध्यक्ष राहुल सिद्धार्थ पंचभाई सरपंच ग्रा.पं.वाकल हे होते.
ह्या प्रसंगी शिलाताई कंनाके ह्यांनी बचतगट च्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग दर्शवावा असे सांगितले  राहुल पंचभाई सरपंच ग्रा.पं.वाकल ह्यांनी सर्व महिलांनी दशसूत्री चा अवलंब करावा ह्या बाबत ची माहिती दिली.
नागरे सर तालुका व्यवस्थापक सिंदेवाही ह्यांनी बचत गटाच्या विविध योजना बाबत ची माहिती दिली.
ह्या कार्यक्रमा प्रसंगी
शिलताई कंनाके उपसभापती पं.स.सिंदेवाही,राहुल पंचभाई सरपंच ग्राम पंचायत वाकल, मा.नागरे सर तालुका व्यवस्थापक सिंदेवाही,पितांबर नागदेवते सामाजिक कार्यकर्ते वाकल, कंनाके साहेब सामाजिक, कार्यकर्ते, डॉ.सि.बी.कामडी सामाजिक कार्यकर्ते वानेरी,राहुल चिमलवार सदस्य ग्रा.पं.वाकल, नंदाताई भोयर ग्रा.पं.सदस्य वाकल, सविताताई कोकोडे ग्रा.पं.वाकल,मंगलाताई गावतुरे ग्रा.पं.सदस्य वाकल, नीलिमाताई पोपटे उईके मॅडम प्रभाग समन्वयक,उद्धव मडावी, विद्या नागदेवते अध्यक्ष जागृती महिला ग्रामसंघ,गीता कंनाके सचिव जागृती महिला ग्रामसंघ ह्या उपस्थित होते.
ह्या प्रसंगी सात 7 अपंग लाभार्थी यांना आरो मशिनचे  वाटप करण्यात आले तसेच जागृती महिला ग्राम संघ यांचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते आले.
सदर कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन दिनेश मांदाडे उपसरपंच ग्रा.पं.वाकल यांनी केलं तर प्रास्ताविक राहुल चिमलवार सर व उईके मॅडम यांनी केलं.
आभार प्रदर्शन प्रतिमा राजेंद्र नागदेवते सी.आर.पी.वाकल यांनी मानले
कार्यक्रम यशस्वीतते साठी
वामन कोकोडे ग्रा.पं.कर्मचारी , जगदीश कोकोडे पा.पु.कर्मचारी, रमेश मेश्राम ग्रा.रो.सेवक,श्रीकांत भेंडारे, माया पंचभाई तसेच ग्राम संघाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.