मुल-सिंदेवाही महामार्गावर भिषण अपघात युवक व युवतिचा जागीच मृत्यू

मुल-सिंदेवाही महामार्गावर भिषण अपघात युवक व युवतिचा जागीच मृत्यू 

सिंदेवाही तालुक्यातील सरडपार जवळ अज्ञात वाहनाने दुचाकिला धडक दिल्याने युवक सुमेध राजू अलोने वय 22 मुक्काम पोस्ट डोंगरगाव तालुका मुल व युवती सेजल अनिल कुंभारे वय 19 मुक्काम पोस्ट राजोली तालुका मुल या नवयुवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या  मृतांच्या सोबत अक्षय यादव लेनगुरे मुक्काम पोस्ट डोंगरगाव तालुका मुल हे गंभीर जखमी असल्याने ग्रामीण रूग्णालय सिंदेवाही येथे दाखल करून प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे तात्काळ हलविण्यात आले. हे दोन मुले व एक मुलगी एकाच वाहनाने कुठे जात होते.व यांचे आपसात काय नाते संबंध होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मृतांना सिंदेवाही ग्रामीण रूग्णालय येथे आणुन शवविच्छेदन करण्यात आले. या संपूर्ण घटनेचा तपास नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण हे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत सिंदेवाही तालुक्यातील पवनपार येथील सचिन प्रभाकर मोहूर्ले वय 22 हे दुचाकीने जात असताना जंगली डुक्कर वा वाहनासमोर आल्याने गंभीर दुखापत झाली असल्याने सिंदेवाही ग्रामीण रूग्णालय प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथे तात्काळ हलविण्यात आले.