सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्या युवकांना आधार लिंक करण्याचे आवाहन

सेवायोजन कार्यालयाकडे नावनोंदणी केलेल्या युवकांना

आधार लिंक करण्याचे आवाहन

भंडारा दि. 09: जिल्ह्यातील नोकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार युवकांनी अद्यापही आपल्या सेवायोजन कार्डला आधार कार्ड जोडले (लिंक) केलेले नसेल अशा सर्व उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपली संपूर्ण माहिती (जसे पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल, शिक्षण इत्यादी) भरावी, जेणेकरून महास्वंयम पोर्टलवरील सर्व योजनांचा आपणास लाभ घेता येईल व ऑनलाईन अधिसूचित केलेल्या पदासाठी अर्ज करता येईल.

प्रत्येक उमेदवाराने आपल्या नाव नोंदणीस आधार कार्ड जोडणे (लिंक करणे) व माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे अन्यथा उमेदवार अनेक संधीपासून वंचित राहू शकतो, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी कळविले आहे.