मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज ऑनलाईन सादर करा

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज ऑनलाईन सादर करा

 

भंडारा दि. 6 : भंडारा जिल्हयातील सर्व महाविद्यालय तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की सन 2022-23 करिता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्या करीता शासनाचे जुनी वेबसाईट पोर्टल https://mahadbtmahait.gov.in बंद करण्यात आलेले असुन https://mahadbt.maharashtra.gov.in ही नविन वेबसाईट कार्यांन्वीत करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरण्या करिता सदर वेबसाईट ला भेट द्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

 

सन 2022-23 हे शैक्षणिक सत्र संपण्याकरीता कमी कालावधी शिल्लक असून विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जाची नोंदणी तात्काळ नविन वेबसाईट वर करावी. महाविद्यालयांनी नोंदनीकृत झालेले अनु. जाती, विमाप्र, विजाभज व इमाव प्रवर्गाचे अर्ज तपासणी करुन या कार्यालयाकडे मंजुरी करीता सादर करावे. अनु. जाती, विमाप्र, विजाभज व इमाव प्रवर्गाचा एकही पात्र लाभार्थी शिष्यवृत्ती पासुन वंचीत राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. अधिक माहितीकरिता डॅा.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय, भवन भंडारा, दुरध्वनी क्र.07184-295257 Email- acswobhandara@gmail.com वर संपर्क साधावा.