आंतरराष्ट्रीय तृणधान्य निमीत्त आज रॅलीचे आयोजन

आंतरराष्ट्रीय तृणधान्य निमीत्त आज रॅलीचे आयोजन

भंडारा, दि.02: 2023 हे वर्ष शासनाने आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. तृण भरडधान्याचे आहारात खूप महत्व आहे. आहारात त्याचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रेरीत करण्याच्या दृष्टीने उद्या 3 फेब्रुवारी रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य निमीत्त जिल्हा कृषि विभागामार्फत 3 ते 4 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार असून रॅली तालुका कृषि अधिकारी, कार्यालय, सिव्हील लाईन्स ते जिल्हा क्रिडा संकुल पर्यंत आयोजीत करण्यात आहे आहे.