12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुचना

12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुचना

गडचिरोली, दि.23: सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव विहीत नमून्यात (ऑनलाईन) अर्ज आवश्यक दस्ताऐवज सोबत दिनांक 31 जानेवारी 2023 पर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,सामाजिक न्याय भवन, गडचिरोली येथे किंवा संबंधीत आपल्या महाविद्यालयात दाखल करावे.या दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा (प्रस्तावांचा) विचार केला जाणार नाही. यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तसेच प्रस्ताव सादर न केल्यास व अर्जदाराचे व्यावसायिक पाठयाक्रमात प्रवेश न मिळाल्यास त्याची सर्वशी जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य व अर्जदारांची असेल. तसेच या आधी समितीस दिनांक 23 डिसेंबर 2022 पर्यंत प्राप्त प्रस्ताव निकाली काढण्यात आलेले आहेत. परंतु ज्यांना आजपावेतो जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, अश्या सर्व अर्जदारांचे प्रकरण त्रृटीत असल्याने अर्जदारानी दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी मंगळवारला मानीव दिनांकाचे जात व अधिवास पुराव्यांसह समिती कार्यालयात उपस्थित राहावे.

 

इयत्ता 11 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव घेणे चालू असून संबंधीत महाविद्यालयात /कार्यालयामध्ये सादर करावे.असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,गडचिरोली,देवसुदन धारगावे यांनी कळविले आहे.