भंडारा || मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विषयावर व्याख्यानाचे आयोजन

मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विषयावर व्याख्यानाचे आयोजन

 

भंडारा दि.19 : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त भाषा संचालनालयामार्फत उद्या 20 जानेवारीला जे.एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भंडारा येथे श्री. प्रमोद कुमार अणेराव यांचे’ मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले आहे.

 

या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थाननी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे असून मराठी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ.उज्वला वंजारी यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.