भंडारा || येत्या सोमवारी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा

भंडारा || येत्या सोमवारी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा

 

भंडारा दि.19 : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली 23 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत डिसेंबर 2022 या महिन्या अखेर पोलीस तपासावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.