साकोली नगर परिषदेच्या सांडपाणी व घनकचरा  व्यवस्थापन प्रकल्पाला क्षेत्रीय भेट

साकोली नगर परिषदेच्या सांडपाणी व घनकचरा

 व्यवस्थापन प्रकल्पाला क्षेत्रीय भेट

· अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कचरा व्यवस्थापन प्रक्रियेची घेतली माहिती

 

भंडारा दि 18: ग्रामीण भागात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबाजवणी सोबतच प्रत्येक तालुक्त्या प्लॅस्टीक व्यवस्थापन होणार आहे. त्यामुळे साकोली नगर परिषदेच्या वतीने व्यवस्थापन होत असलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात जिल्हा, तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजीत करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), गट विकास अधिकारी व जिल्हा कक्षाचे सल्लागार, गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) कर्मचारी आदी उपस्थित होते.

 

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 कार्यक्रमाद्वारे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची ग्रामीण भागात अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच तालुकास्तरावर प्लॅस्टीक व्यवस्थापन प्रकल्प साकारण्यात येणार आहे. ग्रामस्तरावर सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाकरीता स्वच्छता सुविधा निर्माण करण्यात येत आहे. तांत्रिकदृष्ट्या स्वच्छता सुविधांचा योग्य तऱ्हेने उपयोग व्हावा, याकरीता नुकतीच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुर्तकोटी यांचे मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. संघमित्रा कोल्हे यांचे नेतृत्वात साकोली नगर परिषदेच्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राला क्षेत्रीय भेट करण्यात आली.

 

यावेळी गट विकास अधिकारी पल्लवी वाडेकर, गट विकास अधिकारी डॉ. शेखर जाधव, गट विकास अधिकारी खिलेंद्र टेंभरे, गट विकास अधिकारी जी. पी.अगर्ते, जिल्हा कक्षाचे अजय गजापूरे, गजानन भेदे, प्रशांत फाये, गट संसाधन केंद्राचे पल्लवी तिडके, शशिकांत घोडीचोर, प्रज्ञा देशमुख, प्रशांत मेश्राम, नागसेन मेश्राम, स्मृती सुखदेवे, निरंजन गणवीर, जनार्धन डोरले व नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

साकोली नगर परिषद सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रक्रल्पाचे निरीक्षक धिरज राणे, शहर समन्वयक मिलन गजापूरे यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देऊन प्रकल्प व्यवस्थापनाची ओळख करून दिली. क्षेत्रीय भेटीदरम्यान साकोली नगर परिषदेने श्रीनगर कॉलोनीत साकारलेल्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध केंद्रांना भेटी देण्यात आल्या. शहरातील नागरिकांकडून नगर परिषदेच्या वतीने ओला, सुका, प्लॉस्टीक, इमारत कचकचरा संकलीत करण्यात येतो. त्या कचऱ्याचे या केंद्रात वर्गीकरण करण्यात येते. विविध ठिकाणी त्यांची साठवणूक केली जाते. सर्वप्रथम प्लॉस्टीक साठवणूक केंद्राला भेट दिली. प्लॉस्टीक कचरा वेगळा काढल्या नंतर त्याचे मशिनने गठ्ठे तयार करण्यात येतात. ते गठ्ठे तयार करण्याची प्रक्रिया समजून प्रात्यक्षीकाद्वारे पाहण्यात आले. ओला व सुका कचरा वर्गीकरण केंद्राला भेट देऊन वर्गीकरण प्रक्रियेची माहिती घेतली. ओला कचऱ्यापासून खत तयार करण्यात येणाऱ्या प्रकल्पाची व निर्माण करण्यात आलेल्या खताची पहाणी केली. सुका कचऱ्याचे वर्गीकरण व साठवणूक केंद्राला भेट देऊन केंद्रात साठवून असलेल्या कचऱ्याची पहाणी केली. त्यांनतर सुका कचऱ्याचे विल्हेवाट कशा पध्दतीने केली जाते याबाबत स्वच्छता निरीक्षक धिरज राणे यांनी प्रक्रिया समजावून दिली.

 

त्याच बरोबर मैला व्यवस्थापन (FSTC) प्रक्रिया केंद्राला भेट देण्यात आली. शहरातील नागरिकांचे सेप्टीक शौचालय भरल्यानंतर त्यातील मैला वॅकुम मशिनद्वारे या प्लॉन्टमध्यें आणल्या जातो. या ठिकाणी त्या मैलावर प्रक्रीया करून खत निर्मिती करण्यात येते. त्या केंद्राला भेट देऊन विस्तृत प्रक्रिया समजून घेतली. शहरातील इमारतींचे बांधकाम करताना निर्माण होणाऱ्या इमारत बांधकाम कचरा केंद्राला भेट देण्यात आली. त्यामध्ये इमारतींपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची पहाणी व त्याचा उपयोग कशाप्रकारे केला जातो, याबाबतची माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली.