महाराष्ट्र राज्य मिनी ऑलंपिक स्पर्धेत वॉटर स्पोट्स अकादमीची चमकदार कामगिरी

महाराष्ट्र राज्य मिनी ऑलंपिक स्पर्धेत वॉटर स्पोट्स अकादमीची चमकदार कामगिरी

 

भंडारा दि. 17 : वॉटर स्पोर्ट हा खूप मेहनतीचा आणि कौशल्याचा खेळ आहे. शिक्षण सुरू ठेवत वेगळी वाट निवडून भंडारा वॉटर स्पोर्टस अकॅडमीतील 20 खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या राज्य शासनातर्फे आयोजित मिनी ऑलिंपिक कनोईंग व कायाकिंग स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादित करून भंडारा जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घातला असून या चमकदार कामगिरीमुळे जिल्ह्याला संपूर्ण राज्यात मानाचे स्थान मिळवून दिले असल्याचे गौरवोदगार जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी काढले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात खेळाडूंच्या घवघवीत यशाबद्दल जिल्हाधिकारी बोलत होते. राज्यशासनाच्या मिनी ऑलंपिक कनोईंग व कयाकिंग स्पर्धेतील एकूण 14 क्रिडा प्रकारापैकी 13 क्रिडा प्रकारात भंडारा वॉटर स्पोर्टस अकॅडमीच्या खेळाडूंनी 5 सुवर्ण, 5 रजत व 3 कांस्यपदक प्राप्त करून आपले राज्य स्तरावरील वर्चस्व कायम ठेवले आहे.

 

वॉटर स्पोट्स अकादमीचे मुख्य मार्गदर्शन शिवछत्रपती विजेता व मुलांच्या चमुचे व्यवस्थापक राजेंद्र भांडारकर, प्रशिक्षक सुभाष जमजारे तसेच मुलींच्या चमुची व्यवस्थापक कल्याणी भांडारकर यांच्या मार्गदर्शनात मिनी ऑलंपिक स्पर्धेत खेळाडूंचा संघ सहभागी झाला होता.

 

या स्पर्धेत प्रशांत ताईतकर के-1, 1000 मीटर सुवर्णपदक, विलास बोरकर के-1, 200 मीटर कास्यपदक, के-2, 1000 मीटर रजतपदक, अमिर निंबार्ते के-2, 1000 मीटर रजतपदक, श्रीवंत शेन्डे सी-2, 1000 मीटर कास्यपदक, सी-4, 1000 मीटर रजतपदक, वैभव वंजारी सी-4, 1000 मीटर रजतपदक, दिशाल सोनबावणे सी-4, 1000 मीटर रजतपदक, कु. मुस्कान उके के-2, 500 मीटर सुवर्णपदक, के-4, 500 मीटर सुवर्णपदक, कु. वैष्णवी आजबले के-1, 500 मीटर सुवर्णपदक, के-4, 500 मीटर सुवर्णपदक, आचल भुरे के-1, 500 मीटर सुवर्णपदक, के-4, 500 मीटर सुवर्णपदक, कु. संजना कंगाले, के-4, 500 मीटर सुवर्णपदक, कु. सबिना लांडगे सी-1, 200 मीटर कास्यपदक, सी-2, 500 मीटर रजतपदक, सी-4, 1000 मीटर रजतपदक, कु. लिना नागलवाडे सी-2, 500 मीटर रजतपदक, कु. अपेक्षा हजारे सी-4, 1000 मीटर रजतपदक, कु. रूपाली टांगले सी-4, 1000 मीटर रजतपदक.

पुढील दोन वर्षात अश्याच पध्दतीचे वॉटर स्पोर्टस अकादमीच्या वतीने आयोजित करण्याचा मानस श्री. भांडारकर यांनी व्यक्त केला.