मराठी भाषेचा दैनंदिन वापरात जाणीवपूर्वक वापर करावा- प्रा.सुमंत देशपांडे

मराठी भाषेचा दैनंदिन वापरात जाणीवपूर्वक वापर करावा- प्रा.सुमंत देशपांडे

· मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त जिल्हा ग्रंथालयात कार्यक्रम संपन्न

 

भंडारा दि. 16 : जगातील अनेक भाषा, बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत .म्हणून रोजच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक व्यवहार करणे, मराठी वाचणे मराठी लिहिणे, मराठीचा प्रसार करणे या बाबी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ . सुमंत देशपांडे यांनी आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.मराठी भाषा पंधरवडानिमित्त जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश मालेगावे होते. एम पटेल महाविद्यालयाच्या मराठी विभाग मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. उज्वला वंजारी, प्राध्यापिका ममता राऊत, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी वैशाली मळेकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींवर उदाहरणासह यावेळी प्रकाश मालगावे यांनी प्रकाश टाकला. तर डॉ.उज्वला वंजारी यांनी मराठी भाषेच्या उज्वल शाली साहित्याचा मागोवा भाषणामध्ये घेतला. प्रा. ममता राऊत यांनी मराठी भाषा कालातीत असून त्याचे संवर्धन करण्यासाठी साहित्य प्रसार प्रचार केला पाहिजे अशी भूमिका मांडली. तर सहायक जिल्हा नियोजन अधिकारी वैशाली मळेकर व शैलजा वाघ दांदळे यांनी सुद्धा यावेळी आपले विचार मांडले. यावेळी ग्रंथ प्रदर्शनात 100 वरून अधिक ग्रंथांची मांडणी यावेळी करण्यात आली होती .

 

जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेन्द्र बोपचे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विषद केली. तर ग्रंथ सहायक नारनवरे यानी संचलन व आभार मानले.