भंडारा | इज ऑफ डुइंग बिझनेस विषयी कार्यशाळा

भंडारा | इज ऑफ डुइंग बिझनेस विषयी कार्यशाळा

 

भंडारा, दि. 6 : व्यावसायीक व उद्योजक यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी उद्योग संचालनालय, मुंबई व मैत्री कक्षा मार्फत 16 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता आंबेडकर भवन, सहाय्यक, आयुक्त समाज कल्याण कार्यालय, भंडारा येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

 

आय.टी. पातळीवर व नियामक पातळीवर केल्या जाणाऱ्या सुधारणा व शासनाने राबविलेल्या विविध सुधारणाविषयी वापरकर्त्याकडून अभिप्राय घेण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेस सुधारणांबद्दल सादरीकरण होणार आहे.

 

यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आयोजन करून उद्योजकांचे शंकांचे समाधान करण्यात येईल. या कार्यशाळेसाठी भंडारा जिल्ह्यामधील औद्योगीक संघटना प्रतिनिधी, नामांकित उद्योजक, भावी उद्योजक, सनदी लेखापाल, वास्तु रचनाकार, उद्योग व्यवसायाशी संबंधित असणारे शासकिय विभागाचे अधिकारी तथा सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत. तेव्हा या कार्यशाळेकरिता प्रतिनिधींनी, आपल्या उद्योजक सहकारी सोबत सकाळी 11 वाजता उपस्थित राहून कार्यशाळा यशस्वी करावी, असे आवाहन महाव्यसवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, यांनी केले आहे.