चंद्रपूर जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगाराला रोजगार देण्यात यावा.

प्रतिनिधी/ अमन कुरेशी (पटेल) सिंदेवाही

चंद्रपुर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगारासाठी जिल्ह्या बाहेर जाऊन रोजगार कराव लागत आहे.परंतु मोबदला व्यवस्थीत मिळत नसल्याने अनेकांना आपला प्रपंच कसाबसा चालवावा लागतो आहे.

संपूर्ण जिल्ह्यात असलेल्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना आपल्याच जिल्ह्यात रोजगार असतांनाही दारोदार भटकावे लागत आहे. जिल्ह्यात कितेक कंपन्या मध्ये वर्कर हे बाहेरील राज्यातील आहेत आपल्या जिल्ह्यातील कंपनी मध्ये स्थानिक युवकांना रोजगार नाही. चंद्रपुर कोलमाइन येथे जास्त प्रमाणात बाहेर राज्यातील कामगार काम करत आहे. जिल्ह्यात कित्येक शिकलेले सुशिक्षित तरुण वर्ग आहेत. परंतु रोजगार नाही.बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा असी मागणी शिवसेना भारतीय कामगार संघटना तथा वाहतूक विभाग जिल्हा अध्यक्ष रब्बानी चिस्ती यांनी केली आहे