गोंडकालीन जुनोना तलाव परिसरात निसर्गाच्या सुगंधाऐवजी घाणीचा दुर्गंध

इको-प्रो तर्फे पक्षी अधिवास जुनोना तलाव परिसर स्वच्छता करीत संवर्धनाची मागणी

चंद्रपूर: गोंङकालीन राजवटीत मनसोक्त भंम्रती आणि जलविहार करण्यासाठी ज्या स्थळी राजा-राणी यायचे त्या जुनोना तलवाच्या निसर्गरम्य ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिवाट कानी यायचा. म्हणूनच आज पर्यटन मोठ्या हौसेने या ठिकाणी आनंद लुटायला येतात. पण, भान हरपून आणि पर्यावरणाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून घाण करू लागले आहेत. त्यामुळे या आल्हाददायक ठिकाणी आता निसर्गाच्या सुगंधाऐवजी घाणीचा दुर्गंध पसरत आहे. इथे पक्ष्यांसह माणसांचादेखील श्वास गुदमरू लागलाय.
पक्षी सप्ताह निमित्त पक्षीप्रेमी ‘पक्षी निरीक्षण’ साठी या जुनोना तलावावर गर्दी करू लागले आहेत. या उपक्रमात अनेक मान्यवर सहभागी झाले होते, सदर परिसर बघता अत्यंत चिंता वाढविणारी आहे. कारण, मौजमजा करायला येणारी मंङळीदेखील सुटीच्या दिवशी या तलाववर गर्दी करताना दिसत आहे, निसर्ग पर्यटनाच्या नावाखाली पार्टी, दारू पिणे, मासांहर करण्याचा प्रकार बिनधास्त सुरू आहे. या पार्टीतील युज अँड थ्रो प्लेट, प्लास्टिक ग्लास, दारू बॉटल, खाद्य पदार्थचे प्लास्टिक, पाणी बॉटल याचा कचरा करतात.
बेलगाम लोकांवर नियंत्रण राहावे म्हणून जुनोना ग्रामपंचायत गाव वेशीवर प्रत्येक वाहनाकडून शुल्क घेते. खरे तर हे उपद्रव शुल्क आहे. मात्र, यामुळे पैसे गोळा करून परिसर स्वच्छता होताना दिसत नाही. सदर तलाव दूषित, अस्वच्छ होऊ नये म्हणून बंधने टाकली जात नाही. तर पैसे घेण्याची गरज कशाला? यावर जलसंपदा विभाग, वनविभाग आणि जिल्हा परिषद यांनी हस्तक्षेप करून तलावाचे सौंदर्य अबाधित राहील याकडे लक्ष पुरवून उपद्रवी पर्यटक यांचेवर निर्बंध टाकण्याच्या दृष्टीने पावले उचलावी, तसे न झाल्यास इको-प्रोने यापुढे आंदोलनाची भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

…..
सध्या थंडी नुकतीच सुरू झाली, आणि तलावात पाणी सुद्धा भरपूर आहे. अद्याप स्थलांतरित पक्षी या तलावावर पोहचले नाहीत. मात्र ज्यांची प्रतीक्षा नसते ते नियमित येतात आणि तलाव परिसर अस्वच्छ-गंदगी करून जातात, हे चित्र पक्षीनिरीक्षणाच्या निमित्ताने पुढे आले. इको-प्रो तर्फे पक्षी सप्ताह निमित्त जुनोना येथील तलाव पक्षी अधिवास परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

” चंद्रपूरकर नागरिकांना आवाहन आहे की, निसर्गरम्य जुनोना तलाव फक्त तलाव नसून, पार्टी करण्याचे ठिकाण नसून, विविध स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्षी अधिवास आहे, जंगलातील वन्यप्राणी यांचा अधिवास क्षेत्रातील पाण्याचे महत्वाचे स्रोत आहे. याचे सौंदर्य आणि महत्व कायम राखले जावे याकरिता सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. या परिसरात आल्यानंतर कुठलेही प्रदूषण, अस्वच्छता आपल्या हाताने होणार नाही याची जाणीव असू दया…!”

– बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो तथा मानद वन्यजीव रक्षक, चंद्रपूर