chandrapur I महान क्रांतीनायक,वीर शहीद बिरसा मुंडा यांचा ११२ वा शहीद दिन साजरा.

महान क्रांतीनायक,वीर शहीद बिरसा मुंडा यांचा ११२ वा शहीद दिन साजरा.

सिंदेवाही – काल सकाळी १०.०० वाजता, महान क्रांतीनायक,वीर शहीद भगवान बिरसा मुंडा यांचा ११२ वा शहीद दिन . मौजा लोनवाही/सिंदेवाही येथील ऑफ्रोट संघटना तथा मूलनिवासी पुरुष बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
ऑफ्रोट संघटनेचे तालुका अध्यक्ष राजुभाऊ ताडाम यांच्या अध्यक्षतेखाली सुनिलभाऊ उईके,मंगलदास मेश्राम सल्लागार ,मिलींद कोवे सचिव ऑफ्रोट,रमेश सिडाम अध्यक्ष बचत गट, गिरीधर गेडाम सचिव बचत गट यांच्या प्रमुख उपस्थितीत महानायक वीर बिरसामुंडा यांच्या फोटोला पुजन करुन विधीवत मालार्पण करण्यात आले. ‘वीर बिरसामुंडा की जय,’ ‘वीर शहीद बिरसामुंडा अमर रहे ‘ अशा घोषना देण्यात आल्या. या निमित्ताने वृक्षारोपन करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत कोवे, दिवाकर मसराम,दोडकू मसराम,तेजराज गेडाम , संजय कोवे,आणि समस्त समाज बांधव महीला व पुरुष बालगोपाल यांचे सहकार्य लाभले.