chandrapur I समाजातील प्रत्येक घटकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा-हरिभाऊ पाथोडे.

समाजातील प्रत्येक घटकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा-हरिभाऊ पाथोडे.

अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका शाखा- सिंदेवाहीच्या वतीने दिनांक २८फेब्रुवारी २०२१ ला आयोजित ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ कार्यक्रमात अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक,प्राचार्य हरिभाऊ पाथोडे हे अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन तसेच चिकित्सक वृत्ती निर्माण झाल्यास नवेगांव(लोनखैरी) सारख्या भानामतीच्या घटना यापुढे घडणार नाहीत. अशा घटनांना खतपाणी घालणांऱ्यांचे पितळ उघडे पाडल्या जाऊ शकेल, यासाठी प्रत्येक शाळा- महाविद्यालयांमध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा होणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अ.भा. अं.नि.स. तालुका नागभिडचे सचिव तथा वन्यजीव अभ्यासक मा. यशवंत कायरकर, अ.भा.अंनिसचे चिमुर तालुका सचिव किशोरशाह आत्राम,जेष्ठ महिला कार्यकर्त्या लीलाताई पाथोडे ह्या होत्या. त्यांनीही याप्रसंगी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विशद केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ.भा.अं नि.स.चे चंद्रपूर जिल्हा सहसचिव अनिल लोनबले यांनी केले. संचालन अ. भा. अं. नि.स.चे सिंदेवाही तालुका सचिव मोरेश्वर गौरकार यांनी तर आभारप्रदर्शन अ.भा.अंनि.स.चे तालुका संघटक डेकेश्वर पर्वते यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ.भा.अंनिस.चे सिंदेवाही तालुका अध्यक्ष अंबादास मेश्राम, युवा संघटक किशोर कावळे, महिला संघटिका राजश्री वसाके यांनी सहकार्य केले.