sindewahi l दूरभाष केंद्र सिंंदेवाही कंट्रोल रूमला शॉर्ट सर्किटमुळे आग.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही चे दूरभाष केंद्रा्रा्च्या्रा्रा्रा्रा् कंट्रोल रूमला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे बोलले जात आहे.

आग लागन्याचे कारण काहीही असले तरी मात्र आग विझविण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत प्रशासनाला कसरत करावी लागली.

सर्वोदय महाविद्यालय परिसरात खेळ खेळत असलेला विद्यार्थ्यांना काल संध्याकाळी बि.एस.एन.एल कार्यालयाच्या इमारतीच्या खिडकीतुन आगेचाधुर निघतांना दिसला त्यामुळे त्यांनी लगेच पोलीस स्टेशन सिंदेवाही यांना माहीती दिली.पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी तात्काळ अग्नीशमन दलाला माहीती देत घटनास्थळी धाव घेतली. विद्युत विभागाचे कर्मचारी यांनी विद्युत पुरवठा खंडित केली.नंतर पाणी टाकुन आग विझविण्यासाठी पुर्ण प्रयत्न चालू असताना नागभिड व मुल येथील अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहचलेत अग्नीशमन दलाच्या जवानांनी पुर्णपणे आग विझवली घटनास्थळी बि.एस.एन.एल.चे.सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नगरपंचात सिंदेवाहीचे मुख्याधिकारी डॉ.सुप्रिया राठोड नगरउपाध्यक्ष स्वप्निल कावळे पोलिस निरीक्षक योगेश घारे पोलिस उपनिरीक्षक गोपिचंद नेरकर विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता अक्षय सहारे निशांत बहादुरे उमेश निकुरे तहसिल कार्यालयाचे आर आय चिळे, व पटवारी जनसेवक नोमान पटेल,निकु भैसारे उपस्थित होते.

काल पासून बि.एस.एन.एल.च्या सर्व यंत्रणा विस्कळीत झाल्याने पुर्णपणे मोबाईल सेवा बंद झाली. हजारो ग्राहकांना याचा त्रास सहन करावे लागत आहे.