रेल्वे समोर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नात….
सिंदेवाही शहरातील मदनापुर वाडी येथील राकेश गणपतराव बोदनवार वय वर्षे ४० याने काल दिनांक २८/ ६ रोजी जाटलापूर गाव परिसरात रेल्वे समोर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ सिंदेवाही पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल करून प्राथमिक उपचार केला.व नंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले. परंतु प्रवासातच त्याचा मृत्यू झाला.
राकेश बोदनवार मानसिक रुग्ण होता.
त्याने यापूर्वी सुद्धा रेल्वेतून खाली उडी मारून जंगलाच्या दिशेने पळाला होता त्यावेळी रेल्वे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन घरी आणून दिला होता.
एकदाच त्याने हातात विळा घेऊन पोलीस स्टेशनला गेला होता आणि पोलिसांना म्हणाला की मी माझ्या बायकोचा खुन करून आलो आहे.
पोलिसांनी लगेच घरी जाऊन चौकशी केली असता असा कोणताही प्रकार घडल्या नसल्याने त्याला समज देऊन घरी पाठविण्यात आले होते.
मृतक मानसिक आजारी होता त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्याचे बोलले जाते.







