Chandrapur I सार्वजनिक वाहतुकीसाठी शासनाच्या निर्बधांचे पालन करणे आवश्यक..

सार्वजनिक वाहतुक व्यवस्था

सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पुढील निर्बधांचे पालन करत, पूर्ण क्षमतेने सुरू राहील. ऑटो रिक्शा- चालक + फक्त २ प्रवासी, टॅक्सी / चारचाकी वाहन- चालक + वाहनाच्या प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के, बस- आरटीओ विभागाकडील नियमानुसार सर्व बसण्याच्या जागा असतील इतके प्रवासी. कोणत्याही परिस्थितीत उभं राहून प्रवास करण्यास प्रवाशांना परवानगी असणार नाही.

सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या सर्व नागरिकांनी काटेकोरपणे योग्य पध्दतीने मास्कचा

वापर करणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लघंन करणारे रक्कम रुपये ५००/- दंडास पात्र राहतील. चारचाकी टॅक्सी मध्ये जर एखाद्या प्रवाशांने मास्क वापरला नसेल, नियमांचे उल्लघन करणारा तो प्रवासी आणि चालक हे प्रत्येकी रक्कम रूपये ५००/- दंडास पात्र राहतील. प्रत्येक वेळी प्रवास पुर्ण करून आलेल्या वाहनांचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक राहील. भारत सरकार कडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार सर्व सार्वजनिक वाहुतक व्यवस्थेमधील चालक तसेच इतर कर्मचारी वर्ग जो की नागरिकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येत असेल, त्या सर्वाचे लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे, आणि लसीकरण पूर्ण होईलपर्यत कोरोनाचे -ve रिपोर्टचे प्रमाणपत्र १५ दिवसांसाठी वैध असलेले जवळ बाळगणे आवश्यक राहील. सदरचा नियम १० एप्रिल, २०२१

पासून लागू होईल. रिक्शॉ आणि टॅक्सीबाबत जर चालकाने प्लास्टिक शिटच्या माध्यमातून स्वत:चे विलगीकरण केल्यास त्याला वरील नियमामधून सूट असेल. तपासणीमध्ये एखाद्या चालक किंवा कर्मचारी वर्ग हा -Ve RTPCR प्रमाणपत्र अथवा लसीकरण न घेता काम करत असलेला आढळल्यास, रक्कम रूपये १०००/- दंडास पात्र राहील. रेल्वेबाबत, रेल्वे प्रशासनाकडून प्रवासादरम्यान कोणताही प्रवासी रेल्वेच्या सामान्य डब्यामधून उभा राहून प्रवास करणार नाहीत, आणि सर्व प्रवासी मास्क वापरतील याची खात्री करावी. रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मास्क न वापरला असल्यास रक्कम रुपये ५००/- दंड आकारला जाईल.