खिश्यातुन पडलेले नगदी रक्कम फिर्यादीस परत पोलीस स्टेशन नागभीड ची कामगिरी
दिनांक २६ डिसेंबर, २०२५ रोजी दुपारी १२:३० वा. श्री शाकीर शेख रा. सुलेझरी यांनी पो.स्टे. नागभीड येथे येवुन सांगितले की, मौजा सुलेझरी बस स्टॉप येथुन घराकडे जात असतांना त्यांच्या पॅन्टचे खिशातून नगदी ५२६००/- रु. रस्त्यावरप डल्याने हरविले आहे. यावरुन नागभीड पोलीसांना त्याबाबत परिसरात विचारपुस केली असता सदर रक्कम एका अनोळखी इसमास मिळाल्याची माहिती प्राप्त झाली यावरुन नागभीड पोलीसांनी रस्त्यावरील अनेक दुकानातील तसेच टोल प्लाझा येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन सदर अनोळखी इसमाचा शोध घेवुन हरवलेली रक्कम आज दिनांक २७/१२/२०२५ रोजी श्री शाकीर शेख रा. सुलेझरी यांना परत केले आहे.
सदरची कामगिरी पोनि श्री रमाकांत कोकाटे यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिलीप पोटभरे, सफौ संजय मांढरे, पोहवा दिपक कोडापे, पोअं जितेंद्र मारभते व पोअं. शुभम बनकर यांनी केली आहे.
याद्वारे आवाहन करण्यात येते की, नागरीकांनी रस्त्यावरील दुकान व घरांचे समोर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावे ज्यामुळे सर्व सामान्यांची मदत करण्यास सुलभ होईल.








