सिंदेवाहीत नगरसेवक युनुसभाई शेख यांच्या पुढाकाराने संविधान दिन साजरा ; ‘संविधान उद्देशिका’चे वाटप

सिंदेवाहीत नगरसेवक युनुसभाई शेख यांच्या पुढाकाराने संविधान दिन साजरा ; ‘संविधान उद्देशिका’चे वाटप

सिंदेवाही, दि. 26 नोव्हेंबर 2025 – भारताच्या संविधान दिनाचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ता तथा नगरसेवक युनुसभाई शेख, अध्यक्ष – निराश्रीत-नीराधार लोकसेवा प्रकल्प, यांच्या वतीने शहरात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने तहसील कार्यालयातील अर्जुनवीस सभागृहात तसेच बाजारपेठ परिसरात नागरिकांना ‘संविधान उद्देशिका’चे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवर, अधिकारी आणि नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देत युनुसभाई शेख यांनी लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांविषयी महत्त्वपूर्ण संदेश दिला.

युनुसभाई शेख म्हणाले,

“ज्याप्रमाणे या सृष्टीत मानवाला जगण्यासाठी ‘ऑक्सिजन’ची गरज असते, त्याचप्रमाणे जीवनातील मूलभूत मूल्ये समजून घेण्यासाठी मानवाला ‘संविधान’ आवश्यक आहे. संविधानाचे मूल्य आत्मसात झाल्यासच लोकशाही सक्षम राहील आणि समाजात समता-बंधुता-न्याय-समानता ही मूल्ये रुजतील.”

या कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान युनुसभाई शेख यांनी संविधान उद्देशिकेचे वितरण करून उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.