अवैधरित्या बनावटी विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या तिघांविरुध्द कारवाई

अवैधरित्या बनावटी विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या तिघांविरुध्द कारवाई

अवैध विदेशी दारु, चारचाकी, दुचाकी व मोबाईल सह एकुण ६,७८,०००/- रुपयाचा माल जप्त

पोलीस स्टेशन पाथरी ची कामगिरी

दिनांक २२ नोव्हेंबर, २०२५ रोजी पाथरी पोलीसांनी गोपनिय माहिती मिळाली की, पोस्टे हद्दीतील मौजा पालेबारसा ते पाथरी रोडनी काही व्यक्ती एका काळया रंगाच्या मोपेड वाहन व एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारने अवैधरित्या विदेशी दारुची वाहतुक करीत आहे. यावरुन पाथरी पोलीसांनी पंचासह आसोला मेंढा गोसीखुर्द नहराजवळ नाकाबंदी केली असता पालेबारसा ते पाथरी रोडने एक काळया रंगाची मोपेड व एक पांढरी कार यतोंना दिसल्याने त्यांना थांबवुन कार मधील युवकास विचारणा केली असता त्याने त्याचे नांव क्रिष्णा धर्मा कंजर वय १९ वर्ष रा. जलनगर वार्ड चंद्रपूर असे सांगितलेवरुन त्याचे कारची डिक्की पाहणी केली असता चुंगडी व खडर्याचे खोक्यात रॉयल स्टॅग कंपनीची ३३६ नग विदेशी दारु १८० एमएल. च्या किं. २५० प्रमाणे एकुण कि. ८४,०००/- रु.चा माल मिळुन आल्याने सदर अवैध विदेशी दारु व वाहतुकीकरीता वापरलेली स्विफ्ट डिझायर क्र. एमएच४०-एआर- ६८०३ किं.अं.५,००,०००/- असा एकुण ५,८४,०००/- रु. चा माल तसेच दुचाकी सुझुकी एक्सेस क्र.एम.एच. ३४-सीपी-२७९८ वरील इसम प्रकाश रमेश भोयर वय ३७ वर्ष रा. भानापेठ वार्ड चंद्रपूर आणि सागर राजेश कंजर वय ३२ वर्ष रा. जलनगर वार्ड चंद्रपूर याचे ताब्यातील दुचाकीत रॉयल स्टॅग कंपनीची ४८ नग विदेशी दारु १८० एमएल. च्या किं. २५० प्रमाणे एकुण कि. १२,०००/- रु.चा माल आणि वाहन किं.अं.६०,०००/- असा एकुण ७२,०००/- रु. चा माल आणि तिघांकडील ३ नग मोबाईल असा संपुर्ण एकुण ६,७८,०००/- रुपयाचा माल जप्त करुन त्यांचेविरुध्द पोस्टे पाथरी येथे गुन्हा नोंदविण्यात आला असुन अटक आरोपींचा दोन दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड घेवुन तपास पाथरी पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री सत्यजित आमले, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री नितेश डोर्लीकर, पोउपनि श्री चाटे व पोलीस स्टॉफ पाथरी यांनी केली आहे.