‘कपास किसान ॲपवर’ नोंदणीकरीता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

‘कपास किसान ॲपवर’ नोंदणीकरीता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 20 : हंगाम 2025-26 मध्ये चंद्रपूर जिल्हयातील एकुण 10 केंद्रावर सीसीआय मार्फत कापूस खरेदी करण्यात येणार आहे. त्याकरीता शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर नोंदणी करावयाची आहे. महाराष्ट्र शासनाने नोंदणी करण्यास 31 डिसेंबर 2025पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतक-यांनी कपास किसान अॅप वर विहीत मुदतीत नोंदणी करून घ्यावी. नोंदणीवेळी काही अडचण येत असल्यास बाजार समितीशी संपर्क करावा. तसेच ज्या शेतकऱ्यांचे Approval झालेले आहे, त्यांनी कापूस विक्रीसाठी स्लॉट बुकींग करून घ्यावे, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जे.के. ठाकूर यांनी कळविले आहे.