दिव्यांग व अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग व अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. १७ : दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याकरिता या योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र जोडप्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विवाह नोंदणी दाखला, वर व वधू यांचे शाळा सोडल्याचे दाखले, वर अथवा वधू यांचे दिव्यांगत्व प्रमाणपत्र, वर व वधू यांचे एकत्रित लग्नातील छायाचित्र, दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारसपत्रे, वर व वधूचे महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र, वर व वधूचे पोस्ट ऑफिसमधील संयुक्त खाते पासबुकची छायांकित प्रत अथवा वर व वधूचे राष्ट्रीयकृत बँकेतील संयुक्त खाते पासबुकची छायांकित प्रत या कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

इच्छुकांनी अर्जांसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, चौथा मजला, आर.सी. मार्ग, चेंबूर (पू.), मुंबई-७१ येथे संपर्क साधावा. या योजनेच्या अर्जाचे नमुने संबंधित कार्यालयात उपलब्ध होतील, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.