अवैधरित्या जनावर (गौवंश) ची वाहतुक करणाऱ्या चौघांविरुध्द कारवाई
तेलंगाना येथील कत्तली साठी नेत असलेल्या एकुण १७ जनावर (गौवंश) ची सुटका
एक पिकअप वाहनासह एकुण ६,७०,०००/- रुपयाची माल जप्त
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी
दिनांक १० नोव्हेंबर, २०२५ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, पो.स्टे.मुल अंतर्गत मौजा बेंबाळ येथुन पिक अप मध्ये गोवंश तस्करी करुन तेलगांना येथे कत्तलीसाठी नेणार आहेत यावरुन स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने मौजा बेंबाळ येथे जावुन माहितीची खात्री केली असता सदर ठिकाणी गोवंश जनावराने भरलेली चारचाकी पिकअप वाहन दिसुन आल्याने वाहनाची पाहणी केली असता त्यात ५ नग गोवंश जनावरे दाटीने, कुरपणे व निर्दयतेने भरुन मिळुन आले व वाहनाखाली १२ नग जनावरे मिळुन आल्याने आरोपी क्र. १ समर्थ नागेश पुप्पलवार वय २१ वर्ष रा. बेंबाळ यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याचा साथीदार आरोपी क्र.२. स्वप्निल फुलझेले रा. एरगाव, ३. मुन्ना शामराव मुद्रिक दोन्ही रा. बेंबाळ व आरोपी क्र.४ अशपाक कुरेश आरोपी क्र.५ रहमान कुरेश रा. गोंडपिपरी यांचेसह सदर जनावरे तेलगांना येथे कत्तलीकरीता नेणार असल्याचे सांगितले आहे. यावरुन सदर एकुण १७ नग गोवंश जनावरे किंमत १,७०,०००/- रु. आणि एक पिकअप वाहन क्र.एम.एच.३४-सीक्यु-०६९४ किं. ५,००,०००/- रु. चा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन मुल येथे विविध कलमान्वये अप.क्र.४८८/२०२५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई श्री मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि श्री विनोद भुरले, सफौ धनराज करकाडे, पोहवा सुरेंद्र महतो, पोअ प्रदीप मडावी, अजीत शेन्डे, प्रफुल्ल गारघाटे, नितेश महात्मे यांनी केली आहे.








