चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर
चंद्रपूर ११ नोव्हेंबर – महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार चंद्रपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत आज दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडली. या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गांतील आरक्षण निश्चित करण्यात आले असून, महिलांसाठी एकूण ३३ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.
या आरक्षण सोडतीनुसार – एकूण ६६ सदस्य संख्यापैकी
अनुसूचित जाती (अजा) : १३ जागांपैकी ७ महिला
अनुसूचित जमाती (अज) : ५ जागांपैकी ३ महिला
नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) : १७ जागांपैकी ९ महिला
सर्वसाधारण प्रवर्ग : ३१ जागांपैकी १४ महिला
एकूण महिला आरक्षण – ३३ जागा
ही सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली असून, या प्रसंगी आयुक्त डॉ.विद्या गायकवाड,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिद्रवार,मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी,साहाय्य आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,शहर अभियंता रवींद्र हजारे,राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नागरिक तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
सदर आरक्षणाचे प्रारूप चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे १७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात येणार असून, यावर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत राहणार आहे. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.
अनुसूचित जाती (अजा) – महिलांसाठी आरक्षित ७ जागा
१) प्रभाग क्र.४ (अ) बंगाली कॅम्प
२) प्रभाग क्र.६ (अ) इंडस्ट्रिअल इस्टेट
३) प्रभाग क्र.९ (अ) नगिनाबाग
४) प्रभाग क्र.१२ (अ) महाकाली मंदिर
५) प्रभाग क्र १४ (अ) भिवापूर
६) प्रभाग क्र.१६ (अ) हिंदुस्थान लालपेठ कॉलरी
७) प्रभाग क्र.७ (अ) जटपुरा
अनुसूचित जमाती (अज) – महिलांसाठी आरक्षित ३ जागा
१) प्रभाग क्र.१ (अ) दे.गो तुकूम
२) प्रभाग क्र.११ (अ) भानापेठ
३) प्रभाग क्र.१६ (ब) हिंदुस्थान लालपेठ कॉलरी
नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिलांसाठी आरक्षित ९ जागा
१) प्रभाग क्र.२ (ब) शास्त्रीनगर
२) प्रभाग क्र.३ (क) एम.ई. एल.
३) प्रभाग क्र.५ (ब) विवेकनगर
४) प्रभाग क्र.६ (ब)इंडस्ट्रियल इस्टेट
५) प्रभाग क्र.१० (ब) एकोरी मंदिर
६) प्रभाग क्र.८ (अ) वडगाव
७) प्रभाग क्र.१३ (ब) बाबूपेठ
८) प्रभाग क्र.१५ (अ)विठ्ठल मंदिर
९) प्रभाग क्र.१२ (ब) महाकाली मंदिर
सर्वसाधारण प्रवर्ग – महिलांसाठी आरक्षित १४ जागा
१) प्रभाग क्र.१ (क) दे.गो.तुकूम
२) प्रभाग क्र.२(क) शास्त्रीनगर
३) प्रभाग क्र.३ (ड) एम.ई. एल.
४) प्रभाग क्र.४ (क) बंगाली कॅम्प
५) प्रभाग क्र. ५ (क) विवेकनगर
६) प्रभाग क्र.७ (क) जटपुरा
७) प्रभाग क्र.८ (क) वडगाव
८) प्रभाग क्र.९ (क) नगिनाबाग
९) प्रभाग क्र.१० (क) एकोरी मंदिर
१०) प्रभाग क्र.११ (क) भानापेठ
११) प्रभाग क्र.१३ (क) बाबुपेठ
१२) प्रभाग क्र.१४ (क) भिवापूर
१३) प्रभाग क्र.१५ (क) विठ्ठल मंदिर
१४) प्रभाग क्र.१७ (क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर








