वन विभाग व स्वाब नेचर केअर फाउंडेशन द्वारे पक्षी निरीक्षण आयोजन

वन विभाग व स्वाब नेचर केअर फाउंडेशन द्वारे पक्षी निरीक्षण आयोजन

5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर हे शासनातर्फे ज्येष्ठ पक्षी अभ्यासक , पक्षी तज्ञ मारुती चित्तमपल्ली व ज्येष्ठ पक्षीशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्य शासन व स्थानिक पर्यावरण संस्थांद्वारे या काळात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. स्थानिक व प्रवासी पक्षी, तसेच पक्षांबद्दल चे पर्यावरणातील महत्त्व, पक्षी संरक्षणाचे त्यामागील उद्देश, राज्यातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धनाच्या दृष्टीने निसर्गातील प्रत्येक घटकाचे महत्त्व विशद व्हावे, लोकजागृती व्हावी हे यामागचे उद्देश्य घेऊन हा पक्षी सप्ताह साजरा केला जातो.

याच अनुषंगाने सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत थकाबाई तलाव परिसरात पक्षी निरीक्षण, पक्षांच्या नोंदी व पक्षांबद्दल, पर्यावरणाबद्दल सविस्तर माहिती देत सिंदेवाही वनपरिक्षेत्र वन विभाग व स्वाब संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम अंजली सायंकार (बोरावार) मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही, यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात पक्षी अभ्यासक रोषन धोतरे यांनी पक्षांची ओळख, पक्षांबद्दल बारकावे संगीतले, या नंतर परिसरात आढळणारे प्राणी, पक्षी, व साप याबद्दल महत्त्व संस्थेच्या वतीने अध्यक्ष यश कायरकर, बचाव दल प्रमुख जिवेश सयाम यांनी सविस्तर पटवून दिले. व यावेळी मोर, चित्रबलाक, हळद्या, हरीयाल, पोपट, पानकावळा, अशा विविध प्रकारच्या 21 पक्षांच्या नोंदी करण्यात आल्या, मात्र अजूनही परिसरामध्ये कोणतेही प्रवासी पक्षी आल्याचे आढळून आले नाही. यानंतर स्वाब संस्थेद्वारे आणलेल्या विविध सीताफळ, जांभूळ, चींच, करवंद, बादाम अशा फळं वृक्षांच्या बियाणे तलावाच्या परिसरामध्ये शिंपन्यात आल्या. अंजली सायंकार (बोरावार) मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी सिंदेवाही यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाचे समारोप केला.

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील वन कर्मचारी चौके वनपाल, फुलझेले वनरक्षक, पेंदाम वनरक्षक, धनविजय वनरक्षक, चौधरी वनरक्षक, जावळे वनरक्षक, बोरकर वनरक्षक, चिकराम वनरक्षक, नागोसे वनरक्षक, गेडाम वनरक्षक, मडावी वनरक्षक, राठोड वनरक्षक, सोरते वनरक्षक, कु.वाघमारे वनरक्षक, सौ .गायकवाड वनरक्षक, कु.किनेकर वनरक्षक, कु. गजभे वनरक्षक, तर स्वाब संस्थेचे पदाधिकारी गणेश गुरनुले, जीवन गुरनुले, कैलास बोरकर, आदित्य नान्हे , गणेश गावतुरे ,सुरज नेवारे, सौरव मोहुर्ले, रोहीत कापेवार, यांनी सहभाग घेतला. या पक्षी निरीक्षणाकरिता सिंदेवाही येथील ज्ञानधारा अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी/ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.