(गोवंश) जनावरांची कत्तली करीता अवैध वाहतुक करणारे विरुध्द कारवाई
असा एकुण 5,85,000/- रु. चा माल जप्त
स्टेशन गोंडपिपरी ची कामगिरी
पोलीस ठाणे गोंडपिंपरी अंतर्गत गोपनीय बातमीदाराने बातमी दिली की मौजा करंजी येथे एका पिक अप वाहनांमधून अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तलीकरिता वाहतूक होणार आहे यावरून करंजी येथे नाकाबंदी केली असता संशयित पिक अप वाहन येताना दिसले सदर वाहनास हात दाखवून थांबवण्याचा इशारा केला असता वाहनचालक न थांबता पुढे निघून गेला त्याचा पाठलाग केला असता सदर वाहन चालकाने आपले वाहन दुबागुडा जाणाऱ्या पाणंद रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जातीचे एकूण 12 जनावरे दाटेवाटीने बांधून त्यांना कतलीकरिता घेऊन जात असल्याचे दिसून आले जनावरांना खाली काढून चेक केले असता त्यापैकी 4 जनावरे मरण पावलेली दिसून आले अशाप्रकारे 12 गोवंशय जनावरे किंमत 1,85,000/- व पिक अप वाहन क्रमांक MH 34 BZ 6550 किंमत अंदाजे 400000/- असा एकूण 5,85,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मूल श्री सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रमेश हत्तीगोटे यांचे नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक खुशाल टेकाम ,pc प्रविण कदम, गायकवाड यांनी केली आहे.






