घरातील चोरी व मोबाईल चोरी करणारा विधी संघर्ष बालकाकडुन एकुण ३,२३,४००/-रुपयाचा माल जप्ती 

घरातील चोरी व मोबाईल चोरी करणारा विधी संघर्ष बालकाकडुन एकुण ३,२३,४००/-रुपयाचा माल जप्ती 

पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर ची कामगिरी

दिनांक २२ सप्टेंबर, २०२५ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे फिर्यादी नामे सौ. निता आकाश आत्राम रा. नांदगांव पोडे यांनी रिपोर्ट दिला होता की, रात्रौ दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने त्यांचे घराचे आत प्रवेश करुन फिर्यादीचे बॅग मध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने व नगदी असा एकुण २६,४००/- रु.चा माल चोरुन नेला आहे यावरुन पोस्टे चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक ६९८/२०२५ कलम ३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करुन त्याचा तपास करीत असतांना दि.४/११/२०२५ रोजी गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशिर माहितीवरुन एक विधी संघर्ष बालकास ताब्यात घेवुन त्याचे कडे विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हया व्यतिरिक्त पोस्टे चंद्रपूर शहर येथील अप.क्र.६९९/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. व अप.क्र. ७६८/२०२५ कलम ३०५, ३३१ (३) भारतीय न्याय संहिता चा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याचे कडुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागीने किं. १८,४००/- रु. व एक अॅक्टीव्हा मोपेड क्र.एम.एच.३४-बी.एस. २४५२ किं.अं. ३५०००/- रु. आणि सदर विधी संघर्ष बालकाने चोरलेले वेगवेगळया कंपनीचे १७अॅन्ड्राईड मोबाईल किं.अं.१,७०,०००/- रु. व एक अॅपल कंपनीचा लॅपटॉप किं. १,००,०००/- रु. असा एकुण ३,२३,४००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री प्रमोद चौगुले उपविभीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. निशीकांत रामटेके यांचे नेतृत्वात सपोनि श्री राजेंद्र सोनवणे, पोउपनि श्री दत्तात्रय कोलाटे, श्री विलास निकोडे, पोहवा संजय धोटे, सचिन बोरकर, निकेश ढेंगे, जावेद सिध्दीकी, भावना रामटेके, कपुरचंद खैरवार, रुपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदुरकर, विक्रम मेश्राम प्रफुल भैसारे, मपोअं दिपीका झिंगरे, सारीका गौरकार यांनी करीत आहे.