मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम प्रारूप मतदार याद्या १४ नोव्हेंबर रोजी होणार प्रसिद्ध
चंद्रपूर ०६ नोव्हेंबर – राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रमात बदल केला आहे. २८ नोव्हेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती, ती आता १२ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
चंद्रपूर महापालिका प्रशासन आता प्रारुप मतदार यादी ६ नोव्हेंबर ऐवजी १४ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करणार आहे. या यादीवर १४ ते २२ नोव्हेंबर दरम्यान हरकती व सूचना मागवून ६ डिसेंबर रोजी निर्णय घेऊन प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. त्याचबरोबर ८ डिसेंबरला रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करून १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार या यादी सुधारित आदेशानुसार जारी केली जाणार आहे.








