एकसूत्र भारत, अटूट भारत राष्ट्रीय एकतेसाठी चंद्रपूर पोलीस दलाचे वॉक फॉर युनिटी
देशाच्या अखंडतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्त चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने वॉक फॉर युनिटी ही शौर्य, सेवा आणि एकतेचा संदेश देणारी विशेष पायदळ रॅली आज शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी 7.00 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक चंद्रपूर ते गांधी चौक मार्गे पोलीस मुख्यालय चंद्रपूर पावेतो आयोजित करण्यात आली होती.
श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात आणि श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री प्रमोद चौगुले, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे नेतृत्वात या पायदळ रैलीत पोलीस निरीक्षक पोस्टे चंद्रपूर शहर, रामनगर, दुर्गापूर व सपोनि पडोली, तसेच पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर, अर्ज शाखा, सायबर पोस्टे, वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपूर राखीव पोलीस निरीक्षक सह संबंधीत पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातील विविध शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे मोठया संख्यने उपस्थित होते.
तर चंद्रपूर शहरातील वरिष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील व्यवसायिक, विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषतः एनएसएस व एससीसी कॅटेड आणि विविध समाजसेवी संघटना, योग नृत्य क्लब योगा क्लब व प्रतिष्ठीत नागरिक मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.
कार्यक्रमाचा मुख्य हेतू
राष्ट्रीय एकता,ए सामाजिक सौहार्द आणि देशप्रेमाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे, सरदार वल्लभभाई पटेलांच्या विचारांप्रमाणे, अखंड भारताची भावना जनमानसात रुजवणे हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे.
या कार्यक्रमातून उपस्थित शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना एकतेचा, सामूहिक जबाबदारीचा आणि देशहिताचा संदेश देण्यात येवुन सरदार पटेलांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन पोलीस दल आणि समाज यांच्यातील बांधिलकी अधिक दृढ करण्यायाठी मार्गदर्शन करण्यात आले सोबतच सायबर गुन्हे व उपाय योजना, मुली व महिलांची सुरक्षितता, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, वाहतुक नियमन बाबत फलक व स्लोगन व माहिती देवुन जनजागृती करण्यात आली आणि शेवटी राष्ट्रीय एकताची शपथ घेवुन पोलीस मुख्यालय परिसरात वृषारोपन करण्यात आले आहे. तत्पुर्वी पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे रक्तदान शिबीराचे सुध्दा आयोजन करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी आपले मनोगत मध्ये सांगितले की, चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणुन नावलौकिक असुन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांच्या लौह इच्छाशक्तीने जसा देश एकसंध झाला आहे तसाच आजचा विद्यार्थी, पोलीस दल आणि प्रत्येक नागरिकही एकसंघ होवुन समाजातील फाटे मिटवून एकसूत्र भारत या ध्येयासाठी उभा राहुन वर्षानूवर्षे चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हयाचे नावलौकिक कायम ठेवतील असा ठाम विश्वास असल्याचे सांगितले आहे.









