रामनगर पोलीसांनी सराईत गुन्हेगारास केले स्थानबध्द
पोलीस ठाणे रामनगर जि. चंद्रपुर पोलीस नी दिनांक 28/10/2025 रोजी प्रस्तावित स्थानबध्द ईसम नामे महेद्र आनंदराव दुमणे वय 43 वर्ष धंदा- मजुरी रा. गजानन मंदीर जवळ बापटनगर चद्रपुर याचे विरुध्द कलम-03 (1), (ब) महाराष्ट्र झोपडपटटी हातभटटीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, 1981 (सुधारणा 2009,2015) अन्वये 01 वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचे आदेश होणेबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे.
नमुद प्रस्तावित ईसम नामे महेद्र आनंदराव दुमणे वय 43 वर्ष धंदा- मजुरी रा. गजानन मंदीर जवळ बापटनगर चद्रपुर याचे विरुध्द सन 2020 ते सन 2025 पावेतो सदर कालवधीत पोलीस ठाणे रामनगर व ईतर पोस्टेला येथे शरीराविरूध्द व मालमत्ता विरुध्द विविध कलमान्वये एकुण 06 गुन्हयाची नोंद आहे. तसेच सदर प्रस्तावीत ईसमाविरुध्द क.56 मपोका अन्वये स्थाबध्द (तडीपार) तसेच कलम-110 (ई), (ग) जाफौ अन्वये प्रतीबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. पंरतु सदर प्रस्तावित ईसम हा बंधपत्र कालावधीत सुध्दा गुन्हे केल्याने बॉन्ड रदद् करण्यात आलेला होता.
प्रस्तावित स्थानबध्द ईमस नामे महेद्र आनंदराव हुमणे वय 43 वर्ष धंदा मजुरी रा. गजानन मंदीर जवळ बापटनगर चद्रपुर हा चंद्रपुर शहर परीसरात दहशत निर्माण करून तो सामान्य नागरिकांचे जनजिवन विस्कळीत केलेले आहे. प्रस्तावित ईसमाविरुध्द पोलीस ठाणे रामनगर व ईतर पोस्टेला शरीराविरुध्द व मालमत्ता विरुध्द विविध कलमान्वये एकुण 06 गुन्हयाची नोंद आहे. त्यामध्ये त्याने अवैध दारू विकी, खुनाचा प्रयत्न करणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन दंगा करणे, गंभीर दुखापत व मारहाण करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, स्वतःकडे अवैध अग्नीशस्त्र बाळगुन धाक दाखविणे, शिवीगाळ व धमकी देणे ईत्यादी चढत्या कमाने गुन्हे केलेले आहे. त्यावर दाखल असलेल्या गुन्हयावरून असे दिसुन येते की, तो एकटा तसेच साथीदारासह गुंडागर्दी करून दहशत निर्माण करून सर्वसाधारण जनतेच्या मनात भिती निर्माण करून त्याचे जिवीतास व मालमत्तेस धोका पोहचवुन सार्वजनिक शांतता व मुव्यवस्थेस बाधा निर्माण करीत असतो. त्याचे या गुन्हेगारी व धोकादायक कृत्यामुळे पोलीस ठाणे रामनगर हददीत त्याचे विरुध्द कोणीही तकार देण्यास धजावत नाही व त्याचे दहशतीमुळे परीसरातील सामान्य लोकांचे जनजिवन विस्कळीत झालेले आहे.
प्रस्तावित स्थानबध्द ईमस नामे महेद्र आनंदराव दुमणे वय 43 वर्ष धंदा-मजुरी रा. गजानन मंदीर जवळ बापटनगर चन्द्रपुर याचेवर विविध कलमान्वये रामनगर व ईतर पोलीस ठाणे येथे गुन्हयाची नोंद असुन त्याचे प्रवृत्तीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. करीता त्याचेवर प्रतिबंध व्हावा करीता याचेवर विरुध्द कलम 03 (1), (य) महाराष्ट्र झोपडपटटी हातभटटीवाले, औषधी विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, 1981 (सुधारणा 2009,2015) (एम.पी.डी.ए.) अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचे आदेश होणेबाबतचा प्रस्ताव करून मा. जिल्हाधिकारी सा. कार्यालय चंद्रपुर याचे आदेशान्वये नमूद प्रस्तावित ईसमास 01 वर्षाकरीता स्थानबध्द आदेश पारीत केल्याने नमुद ईसमास दि 28.10 2025 रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे दाखल करून स्थानबध्द करण्यात आलेले आहे. पुढे त्यास छत्रपती संभाजी नगर कारागृह येथे दाखल करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक श्री सुदर्शन मुमक्का, श्री ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक, श्री. प्रमोद चौगुले पोलीस उपविभागीय अधिकारी चंद्रपूर, रामनगर पो स्टे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री. आसीफराजा बी. शेख, पोलीस निरीक्षक, श्री अमोल काचोरे, स्थागुशा चंद्रपूर यांचे मार्गदर्शनांत सपोनि योगेश खरसान प्रभारी पोस्टे कोठारी, पोलीसउपनिरीक्षक, सुरेंद्र उपरे, सोबत पोहवा संजु देशवाले, पोहवा अरूण खारकर, पोअं परवेज शेख, पोअं. अनिल जमकातन, पोअं. राज् चिताडे, मपोहवा मनीषा मोरे, मपोशि ब्ल्यूटी साखरे, व स्थानीक पोस्ने रामनगर येधीन्ड गुन्हे अन्वेशन पथकातील अधि व अमलदार यानी केलेली आहे.










