राज्यमंत्री इंद्रनील नाईक 9 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात

राज्यमंत्री इंद्रनील नाईक 9 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर, दि. 08 : राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे 9 ऑक्टो. रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

9 ऑक्टो रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व पदाधिका-यांसोबत बैठक, सकाळी 11 वाजता अधिका-यांसोबत विविध विषयांबाबत आढावा बैठक, दुपारी 12.15 वाजता दुर्गापूर येथे पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 2 वाजता नवीन सिनाळा, चंद्रपूर येथे श्री. भटारकर यांच्या निवासस्थानी भेट, दुपारी 3 वाजता भटाडी नदीवरील पुल बांधकामाची पाहणी, दुपारी 3.30 वाजता यवतमाळकडे प्रयाण.