शासकीय वाहनांच्या विक्रीकरीता निविदा आमंत्रित
चंद्रपूर, दि. 06 : निर्लेखित केलेली शासकीय वाहने, ज्या स्थितीत आहे व जेथे आहे, त्या स्थितीत वाहनांची विक्री करावयाची असल्यामुळे इच्छुक खरेदीदारांकडून 13 ऑक्टोबर 2025 च्या दुपारी 2 वाजेपर्यंत मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहे.
प्रत्येक वाहनासाठी निविदा फॉर्मची किंमत 1 हजार रुपये असून सहायक जिल्हा नाझर, जिल्हा कार्यालय, चंद्रपूर यांच्याकडे कार्यालयीन वेळेत 13 ऑक्टो च्या दुपारी 2 वाजेपर्यंत प्राप्त करता येतील. लिलावाच्या अटी व शर्तीबाबत उल्लेख निविदा फॉर्म मध्ये राहील, त्याच्या अधीन राहून निविदा स्वीकारल्या जातील. प्राप्त निविदा 13 ऑक्टो रोजी दुपारी 4 वाजता उपस्थितांसमोर उघडण्यात येईल. शासकीय वाहनांच्या बाबतीत पुरेशा निविदा प्राप्त न झाल्यास शासकीय वाहनांची विक्रीबाबत खुली बोली बोलून लिलाव त्याच दिवशी करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे.
वाहनांचा तपशील : 1. इन्होव्हा डी.व्ही. वाहन (क्रमांक : एम.एच.34, 8811), बाजारमुल्य किंमत – 6 लक्ष 50 हजार रुपये, वाहन उपलब्ध असल्याचे ठिकाण – मोटार परिवहन विभाग, पोलिस मुख्यालय, चंद्रपूर.
2. इन्होव्हा डी.व्ही. वाहन (क्रमांक : एम.एच.34, 9900), बाजारमुल्य किंमत – 3 लक्ष 50 हजार रुपये, वाहन उपलब्ध असल्याचे ठिकाण – मोटार परिवहन विभाग, पोलिस मुख्यालय, चंद्रपूर.
3. टाटा सुमो वाहन (क्रमांक : एम.एच.34, 8494), बाजारमुल्य किंमत 52 हजार रुपये, वाहन उपलब्ध असल्याचे ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालयसचे प्रांगण, चंद्रपूर.
4. टाटा सुमो वाहन (क्रमांक : एम.एच.34, 8601), बाजारमुल्य किंमत 40 हजार रुपये, वाहन उपलब्ध असल्याचे ठिकाण – जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगण, चंद्रपूर