अवैधरित्या दारु वाहतुक करणारे दोघांविरुध्द कारवाई, ६,४७,२००/- रु.चा माल जप्त पोलीस

अवैधरित्या दारु वाहतुक करणारे दोघांविरुध्द कारवाई, ६,४७,२००/- रु.चा माल जप्त पोलीस

स्टेशन ब्रम्हपुरी ची कारवाई

दिनांक २९/०९/२०२५ रोजी ब्रम्हपुरी पोलीसांना गोपनिय बातमीदारा कडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, ब्रम्हपुरी येथील एक इसम हा नागभीड ते ब्रम्हपुरी रोडनी एक चारचाकी वाहनामध्ये अवैधरित्या दारु बाळगुन वाहतुक करीत आहे. यावरुन ब्रम्हपुरी पोलीसांनी पॉलीटेक्नीक कॉलेज ब्रम्हपुरी रोडवर पोलीस स्टॉफसह नाकाबंदी केली असता स्विफ्ट डिझायर वाहन क्रमांक MH40-Y-6149 हे नागभीड रोड वरुन येत असतांना दिसल्याने त्यास थांबवून त्याची पंचासमक्ष पाहणी केली असता सदर वाहनाच्या डिक्की मध्ये एकुण १५ खर्डाच्या खोक्यामध्ये प्रत्येक खर्डात ४८ नग प्रमाणे एकुण ७२०नग प्रत्येकी १८०एम.एल.च्या दारुचे सिलबंद बाटल्या प्रत्येकी २६०/- रु. प्रमाणे एकुण १,८७, २००/- रुपयाचा माल अवैधरित्या मिळुन आल्याने सदर दारु साठा वाहतुकीकरीता वापरलेला वरील नमुद वाहन किं. ४,६०,०००/- असा एकुण ६,४७, २००/- रुपयाचा माल जप्त करुन आरोपी (१) प्रफुल्ल प्रकाश घरडे वय ३२ वर्ष रा. हनुमान नगर ब्रम्हपुरी (२) अनिल रामभाऊ दांडेकर वय ३० वर्ष रा. हत्तीगोटा ब्रम्हपुरी यांचे विरुध्द कलम ६५ (अ), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री राकेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, ब्रम्हपुरी यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार ब्रम्हपुरी पोनि श्री प्रमोद बानबले यांचे नेतृत्वात सपोनि श्री मनोल खडसे, पोहवा योगश शिवणकर, अजय कटाईत, मुकेश गजबे, पोअं स्वप्नील पळसपगार, इरशाद खान, चंदु कुळसंगे सर्व पोस्टे ब्रम्हपुरी यांनी केली आहे.