शासनमान्य ग्रंथ यादीकरीता ग्रंथ पाठविण्याचे आवाहन Ø अंतिम मुदत 15 ऑक्टो. 2025 पर्यंत

शासनमान्य ग्रंथ यादीकरीता ग्रंथ पाठविण्याचे आवाहन

Ø अंतिम मुदत 15 ऑक्टो. 2025 पर्यंत

चंद्रपूर, दि. 30 : राज्यातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना, राज्यात मराठी भाषेत प्रकाशित झालेल्या ग्रंथांची माहिती वा खरेदी करिता मार्गदर्शक ठरावी म्हणून ग्रंथालय संचालनालयाकडून वर्षनिहाय शासनमान्य ग्रंथांची यादी प्रकाशित करण्यात येते.

सन 2024 या कॅलेंडर (1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024) वर्षात प्रकाशित झालेल्या मराठी भाषेतील ग्रंथांची निवड करण्यासाठी आणि शासनमान्य ग्रंथांच्या यादीत समावेश होण्याच्या दृष्टीने सन 2024 या कॅलेंडर वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या व प्रथम आवृत्ती असलेल्या ग्रंथांची प्रत्येकी एक प्रत (Complimentary copy) ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, टार्जन हॉल, मुंबई-400001 यांच्याकडे 15 ऑक्टोबर, 2025 पर्यंत पाठविण्यात यावीत.

सन 2024 या वर्षात प्रकाशित झालेले ग्रंथ जर यापूर्वी संचालनालयास पाठविले असल्यास पुन्हा पाठविण्याची आवश्यकता नाही. सदरचे निवेदन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व ग्रंथालय संचालनालयाच्या www.doi.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याचे प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी कळविले आहे.