ओम ट्रेडर्स येथुन प्लास्टिक डिस्पोजल ग्लास जप्त – ₹10,000 दंड आकारणी
चंद्रपूर 23 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिका झोन क्र. 1 (अ) अंतर्गत येत असलेल्या जटपूरा प्रभाग, रामनगर दुर्गा माता मंदिराजवळील ओम ट्रेडर्स या दुकानावर सोमवार 22 सप्टेंबर रोजी तपासणीदरम्यान कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान दुकानात अंदाजे 150 किलो प्लास्टिक डिस्पोजल ग्लास आढळून आले. सदर साहित्य जप्त करून 10 हजार रुपये प्रशासकीय शुल्क दंड स्वरूपात वसूल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक व थर्माकोल साहित्यावर तसेच डिस्पोजल ग्लाससह विविध वस्तूंवर राज्यभर बंदी घालण्यात आलेली आहे. यामध्ये डिस्पोजल ग्लासचा वापर, साठवणूक व विक्री आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाद्वारे मनपा हद्दीत तपासणी मोहीम राबविण्यात येत असुन नागरिकांनी अशा प्रकारच्या साठ्याबाबत गुप्त माहिती दिल्यास 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. आहे.महानगरपालिकेतर्फे सातत्याने प्लास्टिक व डिस्पोजल साहित्यावरील बंदीबाबत कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी व व्यावसायिकांनी पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
सदर कारवाई प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात, प्रभारी सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, 2. महेंद्र हजारे, स्वच्छता अधिकारी,शुभम खोटे, प्रभारी स्वच्छता निरीक्षक राजु सोम,अतिक्रमण अधिकारी राज खोडे, सफाई दरोगा रोहीत महातव, प्रेमसागर मेश्राम,शक्ती हटवाल, रक्षा बक्सरिया, प्रफुल्ल मेश्राम,महेंद्र बुरांडे, गणेश खनके यांच्याद्वारे करण्यात आली.