अनुवादकांची नामिका स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अनुवादकांची नामिका स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 16 : प्रशासकीय, कायदेविषयक, वैद्यकीय, महसूल, शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील “इंग्रजी मजकुराचा मराठीमध्ये तसेच मराठी मजकुराचा इंग्रजीमध्ये अनुवाद” करू शकणाऱ्या अनुवादकांची मानधन तत्त्वावर नामिका तयार करावयाची आहे. त्यासाठी मोडी मजकुराचा इंग्रजी व मराठीमध्ये अनुवाद, इंग्रजीतून मराठीमध्ये तसेच मराठीतून इंग्रजीमध्ये अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

याबाबतच्या अटी, शर्ती व इतर सविस्तर माहितीसाठी भाषा संचालनालयाचे directorate.marathi.gov.in हे संकेतस्थळ पहावे. संबंधितांनी मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह अर्ज भाषा संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत, 5 वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 या पत्त्यावर 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत पाठवावीत, असे आवाहन भाषा संचालक श्रीमती विजया डोनीकर यांनी केले आहे.