६५ वर्षीय वृध्द महिलेचा विनयभंग करणारे आरोपीस पाच वर्ष कारावासाची शिक्षा
दिनांक ०७/०७/२०२५ रोजी महाकाली मंदीर परिसरात एका ६५ वर्षीय वयोवृध्द महिलेचा विनयभंग करणारा आरोपी नामे अयुब खान साहेब खान पठाण रा. गडचिरोली याचे विरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक ७५५/२०२५ कलम ७४, ७५ (i) (ii), ७६ भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोउपनि तृप्ती खंडाईत, पो.स्टे. चंद्रपूर शहर यांनी करुन आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले असता आज रोजी सदर गुन्हयात मा. विद्यमान न्यायाधिश श्रीमती अभिश्री देव, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश-१ चंद्रपूर यांनी आरोपी विरुध्द दोषसिध्द झाल्याने कलम ६४ (२) (के) सह ६२ भारतीय न्याय संहिता अंतर्गत ५ वर्षाची सक्त मजुरी आणि ५०००/-रु. दंड व कलम २५८ (२) नुसार ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा दिली आहे.
सदर गुन्हयात सरकारी अभियोक्ता म्हणुन कामकाज अॅड. श्री एस.आर.डेगावार यांनी बाजु मांडली तर पैरवी अधिकारी म्हणुन पोहवा /२३७० किशोरी पो.स्टे. चंद्रपूर शहर यांनी काम पाहिले.