‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा चंद्रपूर जिल्हास्तरीय शुभारंभ
चंद्रपूर, दि. 17 : महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंब, समाज व देशाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी ठेवून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारतर्फे ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ हे अभियान दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदोर (मध्यप्रदेश) येथे होणार असून जिल्हास्तरीय शुभारंभ 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता उपजिल्हा रुग्णालय, राजूरा येथे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते होणार आहे.
या अभियानातून चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 23 लाख 43 हजार 712 नागरिकांना थेट लाभ होणार आहे. यासाठी 345आयुष्यमान आरोग्य मंदिरे, 65 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 9 ग्रामीण रुग्णालये, 5 उपजिल्हा रुग्णालये, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे, एचबीटी रुग्णालये व विविध संस्थांमधून आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या ठिकाणी महिलांना विविध विशेष तज्ज्ञांच्या सेवांसह आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. सदर अभियानात धर्मदाय रुग्णालये, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत खाजगी रुग्णालय व इतर अशासकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे.
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानामध्ये महिलांचे आरोग्य तपासणी, माता-बाल आरोग्य सेवा, सिकलसेल व रक्तक्षय तपासणी, लसीकरण सत्रे, मानसिक आरोग्य समुपदेशन, किशोरवयीन जनजागृती, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ई-कार्ड व आभा कार्ड नोंदणी, निक्षय मित्र मोहीम, रक्तदान शिबिरे आदी उपक्रम राबविले जातील.
उपजिल्हा रुग्णालय, राजूरा येथे सर्व विशेतज्ञ स्त्रिरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, कान नाक घसा तज्ञ, नेत्ररोगतज्ञ, शल्य चिकित्सक, भिषक, दंतशल्यचिकित्सक, मानसिक रोगतज्ञ इ. तज्ञांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
1) किटकजन्य रोग, मलेरिया, फायलेरिया, कुष्ठरोग, क्षयरोग, इ. आजारावर प्रतिबंधक उपाययोजनेकरिता मार्गदर्शन व आरोग्य प्रदर्शनाची व्यवस्था 2) रक्तदान शिबिराची व्यवस्था 3) नेत्ररोग तपासणी व नेत्रशस्त्रक्रिया 4) सिकलसेल तपासणी व नोंदणी करुन कार्ड वितरण 5) प्रधानमंत्री जनआरोग्य योजना ई-कार्ड, आभा कार्ड नोंदणी व कार्डचे वितरण 6) प्रयोगशाळाची व्यवस्था व एचएलएल मार्फत सर्व तपासणी 7) औषध वितरणाची व्यवस्था 8) एक्स-रे ची सुविधा 9) आहार प्रदर्शनी व आहारतज्ञाव्दारे मार्गदर्शन 10) कॅन्सर व्हॅन व दंत तपासणीची स्वतंत्र व्यवस्था.
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानचे असे आहे नियोजन : 17 सप्टेंबर रोजी राजीव रतन डब्ल्यु. सी. एल. एरिया हॉस्पीटल घुग्घुस येथे, 18 सप्टेंबर रोजी जिल्हा रुग्णालय, चंद्रपुर येथे, 19 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी आणि उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे, 20 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे, 22 सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे, 23 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे, 24 सप्टेंबर प्रा.आ.केंद्र (ग्रामीण रुग्णालय) जिवती, 25 सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, पोंभुर्णा, 26 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय, बल्लारपुर, 27 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय गोंडपिंपरी आणि ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही, 28 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय कोरपना, 29 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय,सावली, 30 सप्टेंबर ग्रामीण रुग्णालय,नागभिड, 1 ऑक्टोंबर 2025 रोजी, ग्रामीण रुग्णालय,भद्रावती, येथे आयोजन करण्यात आले आहे










